◆ शेवटची तारीख: – १२/०२/२०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ₹ ५०,००० (₹ फक्त पन्नास हजार)
◆ शिष्यवृत्तीबद्दल : –
जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती ही जेएसडब्ल्यू फाउंडेशनचा एक प्रमुख शिष्यवृत्ती आहे. जेएसडब्ल्यू उडान ही शिष्यवृत्ती कॉलेजच्या जास्त फीमुळे दर्जेदार शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विविध जेएसडब्ल्यू प्लांट्सच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे. जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यास आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करियरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करेल. जेएसडब्ल्यू कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती लागू होणार नाही.
◆ कोर्स तपशील: –
खाली नमूद केलेल्या कोर्समध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र आहेत.
कोर्स लेव्हल: – पदव्युत्तर अभ्यासक्रम
- मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड )
- मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (एमसीए)
- मास्टर ऑफ लॉ (एलएलएम)
- मास्टर ऑफ आर्ट्स (एम.ए.) मास कम्युनिकेशन या विषयात.
मास्टर ऑफ सायन्स (एम.एस.सी.) बायोटेक्नॉलॉजी,पशुसंवर्धन या विषयांत. - मास्टर ऑफ फिलोसोफी
- मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स
- मास्टर ऑफ कॉम्प्यूटर मॅनेजमेंट
- मास्टर ऑफ डेंटल सर्जरी
- मास्टर इन इंजीनियरिंग (एम. ई )
- एम.टेक
- एमबीए / पीजीडीएम
- मास्टर ऑफ फार्मसी (एम.फार्म)
◆ पात्रता निकष: –
१) इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण मिळविलेले वर नमूद केलेल्या कोर्सच्या प्रथम किंवा द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
◆ आवश्यक कागदपत्र: –
१) अर्जदार फोटो
२) पत्त्याचा पुरावा
३) ओळखीचा पुरावा
४) शिक्षण गुणपत्रके.(मार्कशीट)
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थी बँक पासबुक
७) ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) महाविद्यालयीन फी पावती
◆ संपर्क तपशील: –
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३
दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index