● शिष्यवृत्तीची माहिती :-
सरोजिनी दामोदरन फाउंडेशनचा विद्याधन शिष्यवृत्ती कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाला पाठिंबा देतो. दहावी /एसएसएलसी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड चाचणी आणि मुलाखत घेऊन निवड केली जाते.
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:- २० ऑगस्ट २०२१
● शिष्यवृत्तीची रक्कम :-
अकरावी आणि बारावीसाठी शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीत जास्त रु. ६००० प्रति वर्ष.
◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-
१) ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे ते विद्यार्थी फाउंडेशनकडून दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
२) जर ते विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती करत असतील तर त्यांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल
३) राज्य, अभ्यासक्रम, कालावधी इत्यादीनुसार पदवी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम १०,००० ते ६०,००० रुपये प्रति वर्ष असते.
● कोण अर्ज करू शकतो? :-
१) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. २ लाखपेक्षा कमी आहे. आणि ज्यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्रातून १०वी च्या श्रेणीत/एसएससी परीक्षा पूर्ण केली आहे.
२) १०वी च्या श्रेणीत/एसएससी परीक्षेत ८५% किंवा ८ सीजीपीए मिळवले आहे. ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील. दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ मार्क ७०% किंवा ७ सीजीपीए असणे आवश्यक आहे.
◆ निवड प्रक्रिया:-
सरोजिनी दामोदरन फाउंडेशन अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरी आणि अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे शॉर्टलिस्ट करेल. या वर्षी, कोविड -१९ परिस्थितीमुळे, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
● महत्वाच्या तारखा:-
१) २० ऑगस्ट २०२१ : अर्ज करण्याची अंतिम तारीख
२) १० सप्टेंबर २०२१: स्क्रीनिंग टेस्ट
३) २४ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२१: या कालावधीत मुलाखत/चाचण्या आयोजित केल्या जातील. शॉर्टलिस्ट केलेल्या प्रत्येक उमेदवाराला अचूक तारीख आणि स्थान कळवले जाईल.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती आवश्यक आहेत
1) छायाचित्र
2) १० वी मार्कशीट (जर मूळ मार्कशीट उपलब्ध नसेल, तर तुम्ही SSC/CBSE/ICSC वेबसाइटवरून प्रोव्हिजनल/ऑनलाइन मार्कशीट अपलोड करू शकता.)
3) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकरणाकडून तयार केलेल; रेशन कार्ड स्वीकारले जाणार नाही.
◆ संपर्काचा तपशील :-
शिष्यवृत्तीबद्दल कोणतीही शंका असल्यास खालील मेल आयडीवर मेल करा.
१) इमेल आयडी :- vidyadhan.maharashtra@sdfoundaionindia.com
किंवा
२) खालील नंबरवर फोन करावा
भुवनेश्वरी श्रुपली
फोन: ९६११८०५८६८
३) वेबसाईट :- https://www.vidyadhan.org/apply/marathi/register/student
◆ शिष्यवृत्ती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल तपशील:-
https://youtu.be/OE3uqFg3WtQ
◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक :-
https://www.vidyadhan.org/register/student