वाहनी शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीची माहिती :

वाहनी शिष्यवृत्ती ही वाहनी स्कॉलरशिप ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था देते. सध्या १२वीमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमासाठी दिली जाते.

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 1 नोव्हेंबर 2025

शिष्यवृत्तीचे फायदे :

संपूर्ण आर्थिक सहाय्य : पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण व होस्टेल/PG फीचा पूर्ण खर्च.

लॅपटॉप स्टायपेंड : ₹45,000

प्रवास भत्ता : वर्षातून एकदा कॉलेजमधून ते मूळ गावी प्रवासासाठी स्टाईपेंड.

इंटरनेट स्टायपेंड

वैयक्तिक मार्गदर्शन : पदवीदरम्यान कौशल्यविकास व नोकरीसाठी तयार करण्यावर लक्ष आणि तज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन

याशिवाय इंटर्नशिप्स, करिअर मार्गदर्शन, इंग्रजी भाषा कार्यक्रम, स्किल वर्कशॉप्स यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

पात्रता निकष :

१) सध्या १२वीत शिक्षण घेत असलेले व १०वीत किमान 85% गुण मिळवलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

२) भारतातील कुठल्याही कॉलेजमधील इयत्ता बारावी मधील विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करू शकतात.

३) या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे.

शिष्यवृत्ती प्रक्रिया :

– ऑनलाइन अर्ज

– मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

– आधार कार्ड व पॅन कार्ड (विद्यार्थी, आई, वडील)

– उत्पन्न प्रमाणपत्र

– रेशन कार्ड

– १०वी व ११वीचे गुणपत्रक

– ३ निबंध

फोटो

ऑनलाइन अर्ज करताना पुढील फोटो आवश्यक असतील (विद्यार्थ्याचा, कुटुंबाचा, लॅपटॉप, दुचाकी व चारचाकी यापैकी जर काही असेल तर)

अधिक माहिती व FAQ साठी लिंक :

🔗 Google Drive माहिती फोल्डर:

https://drive.google.com/drive/folders/1GSoahiSKH4T88W_K01EhJ3h7UJz3MKOk

FAQ – https://www.vahanischolarship.com/faqs

https://www.vahanischolarship.com/admission

ऑनलाइन अर्ज लिंक :

https://admin.vahanischolarship.in/

संपर्क माहिती :

Vahani Scholarship Trust, C-20, डिफेन्स कॉलनी, नवी दिल्ली – 110024

Email: info@vahanischolarship.com

फोन: 9319452777

वेबसाइट: www.vahanischolarship.com