स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹50,000 (पन्नास हजार रुपये )

◆ शेवटची तारीख:- २६ जानेवारी २०२३

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशनकडून भारतात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती दिली जाते . स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश हा भारतातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळविलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे. एकूण शिष्यवृत्तीच्या तीस टक्के शिष्यवृत्ती महिलांसाठी राखीव आहेत. स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन शिष्यवृत्ती भारतातील सरकारी किंवा खाजगी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, एमबीबीएस, फार्मसी, आयटी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभियांत्रिकी, एमबीबीएस, फार्मसी, आयटी आणि आर्किटेक्चरमधील अंडर-ग्रॅज्युएशन कोर्स आणि इतर अंडर-ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम

◆ पात्रता निकष:-
1) ज्या विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये किमान 65% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत (किमान 6.5 CGPA) असे विद्यार्थी स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
3) शिष्यवृत्ती पुढे नमूद केलेल्या अभ्यासक्रमांकरीता दिली जाते. – अअभियांत्रिकी, एमबीबीएस, फार्मसी, आयटी आणि आर्किटेक्चर इ. आणि इतर पदवी अभ्यासक्रम.

टीप:-

  • जे विद्यार्थी आधीपासून कोणत्याही स्त्रोताकडून शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत ते विद्यार्थी स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करत आहेत / पगारदार आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल. (विद्यार्थ्यांनी वेतन प्रमाणपत्र (Salary Slip ) / आयकर परतावा पुरावा ( IT Return File ) सादर करावा)

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) 10वी आणि 12वी मार्कशीट्स/प्रमाणपत्रे
2) सर्व सेमिस्टर मार्कशीट्स
3) कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र
4) प्रवेश पत्र ( ऍडमिशन लेटर ) / रँक प्रमाणपत्र
५) जागा वाटपासाठी समुपदेशन पत्र
६) विद्यार्थ्यांनी भरलेल्या सेमिस्टर / वार्षिक शुल्काचा पुरावा ( फी रिसिप्ट )
7) शिष्यवृत्ती पत्र (इतर कोणती शिष्यवृत्ती मिळत असल्यास ) / शैक्षणिक कर्जविषयक लेटर ( शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास ) / ट्युशन फी माफीबाबत कॉलेजचे लेटर ( जर प्रवेश TFWS- Tuition Fee Waiver Scheme मधून झाले असल्यास ) ,
8) रहिवासी पुरावा किंवा रेशन कार्ड किंवा पालकांचा आयडी पुरावा
९) आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्राची प्रत
10) कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा- पगार प्रमाणपत्र/पगार स्लिप (मागील ३ महिन्यांची) / आयटी रिटर्न फॉर्म ( IT Return File ) / तुमच्या कौटुंबिक उत्पन्नाचे समर्थन करणारे इतर कोणतेही दस्तऐवज
11) शेतजमिनीची कागदपत्रे / दुकानाचे फोटो ( शेती किंवा दुकान असल्यास )
१२) वीज बिलाची प्रत (मागील ३ महिने)
13) शैक्षणिक कर्जाचा पुरावा, जर असेल तर
14) भाडे करार, असल्यास
15) घराचे फोटो (आतील/ बाहेर) आणि कौटुंबिक छायाचित्र
16) संस्थेने प्रमाणित केलेले इन्स्टिट्यूट बँक तपशील

◆ शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया:-
१) खालील लिंकवर उपलब्ध असलेला अर्ज डाउनलोड करा आणि हाताने भरा.
https://drive.google.com/file/d/1GJM9C_FxScRFhBWukbxFOUwmWcIr-R7H/view?usp=sharing
२) इतर कागदपत्रांसह भरलेला अर्ज स्कॅन करा.
३) स्कॅन केलेला अर्ज आणि इतर कागदपत्रे तुमच्या नावासह फोल्डरमध्ये सेव्ह करा.
४) खालील लिंकवर तुमच्या नावासह फोल्डर अपलोड करा. https://www.dropbox.com/request/74jkApvY5hckh4hJaqxd
(टीप:- तुमच्या नावाशिवाय उपलोड केलेल्या फोल्डर/फाइल/कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही)

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.swamidayanand.org/scholarship-india

◆ शिष्यवृत्ती अर्ज अपलोड करण्यासाठी लिंक :-
https://www.dropbox.com/request/74jkApvY5hckh4hJaqxd

◆ अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/1GJM9C_FxScRFhBWukbxFOUwmWcIr-R7H/view?usp=sharing

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन, A-74, तळमजला, सेक्टर-2, नोएडा-201301, UP (भारत)
ईमेल- Scholarships@swamidayanand.org
दूरध्वनी: +91-120-4146823 WhatsApp 8448770654