अर्ज मिळवण्याची अंतिम तारीख: २६ मे २०२५
अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख: २ जून २०२५
एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्तीबद्दल माहिती:
भारतीय विद्यार्थ्यांसाठी श्री बृहद् भारतीय समाजाकडून एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्ती ची संधी उपलब्ध आहे!
जे विद्यार्थी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणार आहेत, त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
ही संधी जात, धर्म, लिंग किंवा सामाजिक गट न पाहता सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
पात्र अभ्यासक्रम:
- अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रम (Postgraduate Engineering Courses)
- वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (Postgraduate Medical Courses)
- तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम (Technology Courses)
- व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Courses)
एस. के. पाटील शिष्यवृत्ती पात्रता निकष:
- दहावीपासून पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत प्रत्येक परीक्षेत प्रथम श्रेणी असणे आवश्यक आहे.
- पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला असावा.
- सप्टेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळालेला असावा किंवा अर्ज केलेला असावा.
- अर्ज करताना अर्जदाराचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
महत्वाची टीप:
- पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
- २०२५ जून अखेरपर्यंत अंतिम परीक्षांचे गुणपत्रक सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्याची पद्धत:
१. स्वतःचा संपूर्ण पत्ता लिहिलेला व ₹१० चे टपाल तिकिट लावलेला २५ सेमी x १८ सेमी आकाराचा लिफाफा तयार करा.
२. दहावीपासून पदवीपर्यंतच्या सर्व परीक्षांचे गुण, टक्केवारी व श्रेणी कोऱ्या कागदावर लिहा.
३. लिफाफा आणि माहिती पुढील पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवा:
पत्ता:
मानद सचिव,
श्री बृहद् भारतीय समाज,
एन. के. मेहता इंटरनॅशनल हाऊस (एलआयसी योगक्षेमच्या मागे),
१७८ बॅकबे रिक्लेमेशन, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
फोन: ७३०४१४१८५०
महत्वाच्या तारखा:
- अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख: २६ मे २०२५
- शिष्यवृत्ती फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख: २ जून २०२५
शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया:
- अर्ज स्वीकारल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना श्री बृहद् भारतीय समाजाकडून अधिकृत शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म पाठवला जाईल.
- हा फॉर्म सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रांसह २ जून २०२५ पूर्वी परत पाठवणे आवश्यक आहे.