सीताराम जिंदाल फाऊंडेशन शिष्यवृत्ती सीताराम जिंदाल फाऊंडेशनद्वारे कोणत्याही डिप्लोमा अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. संपूर्ण भारतातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात
◆ शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:-
जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाहीत त्यांच्यासाठी
मुलांसाठी रु. 1000 प्रति महिना & मुलीसाठी रु. 1200 प्रति महिना
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
मुलांसाठी रु. 2200 प्रति महिना & मुलीसाठी रु. 2400 दरमहा
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: कोणताही डिप्लोमा कोर्स
अभ्यासक्रमाचे नाव:
1. Diploma Courses –
2. Diploma in the field of Environment like : Environment Scientist, Environment Engineer and Environment Journalist.
3. Diploma in Nursing, Pharmacy & Physiotherapy
4. Diploma in Medical Laboratory, X Ray Technology, Operation Theatre Technology, Dialysis Technology, Opthalmic Technology, Dental Mechanics
◆ शिष्यवृत्तीसाठी आवश्यक गुण :-
मुले ५५% & मुली ५०%
◆ पात्रता निकष:-
1 कोणत्याही डिप्लोमा अभ्यासक्रमात शिकणारे आणि गेल्या शैक्षणिक वर्षात किमान 55% (मुलांसाठी), 50% (मुलींसाठी ) मिळवलेले विद्यार्थी सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा :-
i पालक नोकरी करत असल्यास – पालकांचे उत्पन्न प्रति वर्षी चार लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, सॅलरी स्लिप उत्पन्नाचा पुरावा म्हणून सबमिट करावी लागेल.
ii जर पालक नोकरी करत नसतील तर अशा विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकरणांद्वारे (तहसीलदार, महसूल अधिकारी, बीडीओ, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत अध्यक्ष.) जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून सबमिट करावे लागेल.
२) उत्पन्नाचे प्रमाणपत्र हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत जारी केले असल्यास, विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांनी स्वाक्षरीद्वारे प्रमाणित केलेल्या इंग्रजी किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या उत्पनाच्या प्रमाणपत्राची प्रत अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे.
3) सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्ती सर्व शासकीय आणि खाजगी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
५) सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्ती एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी दिली जात नाही.
६) विद्यार्थ्याचे वय ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सीताराम जिंदल फाउंडेशन शिष्यवृत्ती बंद केली जाते.