◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ३१ ऑगस्ट २०२२
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:-
रु 2,40,000 (रु. 80,000/वर्ष)
◆ शिष्यवृत्ती बद्दल :-
डॉ. रेड्डीज फाऊंडेशन सशक्त शिष्यवृत्ती हा डॉ. रेड्डीज फाऊंडेशनचा एक उपक्रम आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून भारतभरातील तरुणींना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. सशक्त शिष्यवृत्ती हा भारतभरातील तरुण महिलांना विज्ञान क्षेत्रात करिअरची तयारी करण्यासाठी आणि त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीचा एक प्रकारचा उपक्रम आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील आणि सामाजिक – आर्थिक परिस्तिथी बिकट किंवा हलाखीची असणाऱ्या मुलींना, त्यांच्या पदवीच्या शिक्षणादरम्यान आर्थिक सहाय्य दिले जाते आणि चांगले मार्गदर्शन देऊन भारतातील काही सर्वोत्कृष्ट विज्ञान संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी संधी दिली जाते.
◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-
1) हि शिष्यवृत्ती B.Sc पदवी मिळवण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाते.
2) B.Sc पदवीच्या तीन वर्षांच्या अभ्यासासाठी रु 2,40,000 (रु. 80,000/वर्ष) शिष्यवृत्ती
3) महिला शास्त्राज्ञ त्याचबरोबर तज्ञानकडून मार्गर्शन
◆ पात्रता निकष:-
1) ज्या इयत्ता १२वी पास विद्यार्थिनी हुशार असून उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वोत्कृष्ट विज्ञान महाविद्यालयांमध्ये B.Sc पदवी अभयसक्रमाकरिता प्रवेश मिळवण्याचा आत्मविश्वास असलेल्या तरुण मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्या मुलींना त्यांच्या पदवीसाठी Bsc ( प्युर & नॅच्युरल सायन्स ) चे शिक्षण घ्यावयाचे आहे अशाच विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
◆ टीप:-
1) शिष्यवृत्तीसाठी ग्रामीण पार्श्वभूमी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी आणि वैज्ञानिक संशोधनात रस असलेल्या मुलींना प्राधान्य दिले जाईल.
2) 12वी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसेल तर विद्यार्थी देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
3) ज्या मुलींचे कौटुंबिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नाही अशाच मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
◆ पुढे नमूद केलेल्या कॉलेज मध्ये Bsc करिता प्रवेश मिळाला तरच विद्यार्थींनी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
मुंबई
1) मिठीबाई कॉलेज
२) सोफिया कॉलेज फॉर वुमन
कोलकाता
1) सेंट झेवियर्स कॉलेज
२) लोरेटो कॉलेज
हैदराबाद
1) सेंट फ्रान्सिस डीग्री कॉलेज फॉर वुमन
2) लोयोला अकॅडमी
दिल्ली
1) मिरांडा हाऊस हिंदू कॉलेज
2) सेंट स्टीफन्स कॉलेज
3) श्री व्यंकटेश्वर कॉलेज
4) हंसराज कॉलेज
5) ARSDC गार्गी कॉलेज
चेन्नई
1) मद्रास ख्रिश्चन कॉलेज
२) स्टेला मॅरिस कॉलेज
3) प्रेसिडेन्सी कॉलेज लोयोला कॉलेज
बॅंगलोर
1) डिपार्मेंट ऑफ सायन्स, ख्रिस्त (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) माउंट कार्मेल कॉलेज
२) सेंट जोसेफ कॉलेज
◆ आवश्यक कागदपत्रे :-
1 इयत्ता दहावी बोर्ड सर्टिफिकेट ( ऐच्छिक )
2 इयत्ता दहावी गुणपत्रिका ( अनिवार्य )
3 इयत्ता बारावी / 10+2 गुणपत्रिका ( अनिवार्य )
4 इयत्ता बारावी / 10+2 बोर्ड सर्टिफिकेट ( ऐच्छिक )
5 उत्पन्न प्रमाणपत्र (अनिवार्य)
6 अपंगत्व प्रमाणपत्र (पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अनिवार्य)
◆ अर्ज प्रक्रिया:-
१) https://www.sashaktscholarship.org वर ऑनलाइन नोंदणी करा
2) ऑनलाइन अर्ज भरा आणि कागदपत्रे सबमिट करा
3) वरती दिलेल्या कॉलेज लिस्ट मधील कॉलेज निवडा.
4) 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वरती दिलेल्या कॉलेज लिस्ट मधील कोणत्याही कॉलेजकडून प्रवेशाची ऑफर सबमिट करा.
5) आपली जर शिष्यवृत्तीकरीता निवड झाली तर फाऊंडेशन कडून मेल केला जाईल.
◆ संपर्काची माहिती:-
डॉ. रेड्डीज फाउंडेशन
6-3-655/12, सोमाजीगुडा, हैदराबाद-500082.
फोन: +91-40-65343424, 23304199 /1868
फॅक्स: +91-40-23301085
ईमेल: info@sashaktscholarship.org
वेबसाइट: www.drreddysfoundation.org
◆ महत्त्वाचे:
शिष्यवृत्ती केवळ अशाच मुलींना दिली जाईल ज्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वरती दिलेल्या कोणत्याही महाविद्यालयात Bsc अभ्यासक्रमाकरिता प्रवेश निश्चित केला आहे.