◆ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ( परदेशात उच्च शिक्षणासाठी ) ◆
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
– विद्यापीठाची शिक्षण फी पूर्ण रक्कम
– वार्षिक निर्वाह निधी अमेरिकेत शिक्षणासाठी १५,४०० यु.एस. डॉलर तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी ९९०० पौड
– व्हिसा शुल्क
– विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी इकॉनोमी क्लासचा विमान प्रवासाचा खर्च
– वैयक्तिक आरोग्य विमा खर्च
– आकस्मात निधी म्हणून ( पुस्तके, अभयसदौरे, कार्यशाळेतील सहभाग , प्रबंध टायपिंग & बायडिंग ) अशा खर्चाकरिता अमेरिकेत शिक्षणासाठी १५,०० यु.एस. डॉलर तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी ११०० पौड
◆ शेवटची तारीख:- २२ जून २०२२
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागामार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते. पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका (पी जी डिप्लोमा ), त्याचबरोबर PHD चे शिक्षण घेण्याकरिता हि शिष्यवृत्ती दिली जाते.
◆ शिष्यवृत्ती कालावधी
पीएचडी- चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
पदव्युत्तर पदवी – तीन वर्षे किंवा प्रत्यक्ष काय अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
पदव्युत्तर पदविका – दोन वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
◆वयोमर्यादा :-
पदव्युत्तर पदवी किंवा पदविका – जास्तीत जास्त ३५ वर्षे
PHD – जास्तीत जास्त ४० वर्षे
◆ शैक्षणिक पात्रता:-
१) परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
२) पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएचडी ( Post Graduation Diploma, Post Graduation and Phd )
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि फार्मसी मध्ये
◆ पात्रता निकष:-
१) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
२) शैक्षणिक वर्ष ( 2022-2023 ) मध्ये पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी करिता प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन 2022 QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग ३०० च्या आत असणे बंधनकारक आहे.
३) उमेदवाराच्या पालकांचे / कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील ( 2021-2022 मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 6 लाखापेक्षा जास्त नसावे
४) दिनांक एक मे रोजी उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
५) हि शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. :
१) विहीत नमुन्यातील अर्ज.
२) सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र.
३) उत्पन्नाचा दाखला.
४) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे. ( Degree Certifivate / मार्क लिस्ट).
५) परदेशातील क्यू.एस जागतिक मानांकन ३०० पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विना अट ऑफर लेटर.
६) ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रकाची प्रत.
७) आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे.
८) दोन भारतीय नागरीकांचे जामीनपत्र.
९) विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असल्यास अथवा कुटुंबातील इतर सदस्य नोकरीत असल्यास त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. १६, व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबांचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे एकत्रित उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, इतर विद्यार्थ्यासाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदारपेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील अर्थिक वर्षाचे कुटुंबांचे सर्व मार्गानी मिळणान्या उत्पन्नाचे एकत्रित उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
१०) ऑफर लेटर वर अभ्यासक्रमाचा किमान नमुद असलेला कालावधी नसल्यास अभ्यासक्रमाच्या
किमान कालावधीबाबतचे विद्यापीठाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
११) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार असल्यास त्या शिक्षण संस्थेस व अभ्यासक्रमास भारतीय आयुर्विज्ञान यांची मान्यता असलेबाबतचा पुरावा.
१२. प्रवेश मिळाल्याचे परदेशातील शैक्षणिक संस्थेचे पत्र, ज्यामध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाची पूर्ण माहिती, शुल्क रचना (डीटेल्स की स्ट्रक्चर), अभ्यासक्रम टप्पे, अभ्यासक्रमाचा कालावधी आणि मिळणारी शिष्यवृत्ती व इतर लाभाबाबत माहिती नमूद केलेले असावे.
१३. परदेशातील वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक (शिक्षण शुल्क, राहण्याचा व भोजनाचा खर्च, पुस्तके, स्टेशनरी प्रबंध लेखन अभ्यास दौरा इत्यादी आवश्यक खर्चाचा तपशील असणारे अंदाजपत्रक) शैक्षणिक संस्थेचे प्रमुखाने प्रमाणित केलेले असावे.
१४. परदेशातील विद्यापीठाची प्रॉस्पेक्टसची प्रत (ज्या मध्ये अभ्यासक्रमाचा इंटर्नशीपसह) पूर्ण कालावधी नमूद केलेला असावा. तसेच Program Hand Book हार्ड Copy सोबत जोडावे.ई-मेल करू नये.
१५. QS World University Ranking जागतिक क्रमवारीची प्रवेश मिळालेल्या विद्यापीठास टीक ( √ ) करुन प्रत जोडावी.
१६. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे (Domicile Certificate) प्रमाणपत्र,
१७. रेशनकार्ड / आधार कार्ड / मतदान ओळखपत्राची प्रत आणि घराचा पत्ता सिध्द करणेसाठी लाईट बील / टेलीफोन बील / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घराच्या कर भरलेबाबतची पावती/ प्रॉपर्टी कार्डचा उतारा या पैकी एक पुरावा.
१८. पासपोर्टची प्रत
१९ परदेशात शिक्षण घेणेसाठी ज्या उद्देशासाठी जायचे आहे या विषयावर इंग्रजी भाषेमध्ये २५० शब्दाचा निबंध,
२०. GRE / TOFEL/IELTS / GMAT इत्यादी आवश्यक परिक्षा उत्तीर्ण असलेबाबतचा पुरावा,
◆ महत्वाचे
१) एका कुटुंबातील फक्त एका विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
२) एक्झिक्यूटिव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झिक्युटिव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांकरता प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही.
३) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणार असेल त्या विद्यापीठास व अभ्यासक्रमास भारतीय आयुविज्ञान परिषदेची (ICMR) मान्यता असणे आवश्यक आहे..
४) परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती मिळणार नाही.
५) यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्तीअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे, असे विद्यार्थी देखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
◆ अर्ज करण्याची पध्दत :-
ऑफलाईन
पुढे दिलेल्या लिंकवर दिलेला अर्ज डाउनलोड करून संपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसहित “ महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे-४११००१” या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा किंवा स्वतः पत्त्या वर जाऊन सबमिट करावा .
अर्ज डाउनलोड करण्याकरिता लिंक :
https://drive.google.com/file/d/1L3gUtgrljo7wikEoJ7gQqgfvTEDfWnK4/view?usp=sharing
◆ QS रँकिंग लिस्ट डाउनलोड करण्याकरिता लिंक :-
https://drive.google.com/file/d/1SU8l0Do3QzQzsaLaajhjYVqLFSywWWPQ/view?usp=sharing
◆ शिष्यवृत्ती माहिती पुस्तिका डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1bCOy72DymIyM1_MAV3qcPzpGIuTCNO4i/view?usp=sharing
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे-४११००१
ईमेल- fs.directorsw@gmail.com
दूरध्वनी क्र. ०२०-२६१२७५६९ / २६१३७९८६