प्रियदर्शनी अकॅडमी शिष्यवृत्ती

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- १५ फेब्रुवारी २०२४

शिष्यवृत्ती बद्दल :-
प्रियदर्शनी अकॅडमीकडून आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयटी, शिक्षण, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, कला, मानवता, सामाजिक विज्ञान, कायदा अशा विषयांतील शैक्षणिक कोर्सेस मध्ये पदवीचे शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्र अभ्यासक्रम:-
शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेली फील्ड (खाली नमूद केलेल्या अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत)
1) अभियांत्रिकी
2) बी.एड.
3) वैद्यकीय
4) आयटी
5) आर्किटेक्चर
6) व्यवस्थापन
7) कला
8) ह्युमॅनिटी
9) सोशल सायन्स
10) law

पात्रता निकष:
अ] अभियांत्रिकी / वैद्यकीय / माहिती तंत्रज्ञान / आर्किटेक्चर / मॅनेजमेंट / आर्ट्स / ह्युमॅनिटी / सोशल सायन्स / law इ.)
1) विद्यार्थ्यांनी पदवी महाविद्यालयात प्रथम वर्ष उच्च कामगिरीसह पूर्ण केलेले असावे
2) विद्यार्थ्‍यांनी पदवीचे पहिले वर्ष डिस्टिंक्टशन मध्ये पास केले असावे. (मागील वर्षीच्या परीक्षेमध्ये ७५% पेक्षा जास्त गन मिळवले असावेत )
3) विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
4) विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न वर्षाला चार लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

B] B. Ed मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष :
1) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्थेत B. Ed अभ्यासक्रमाच्या पाहिलंय वर्षात प्रवेश घेतला असावा.
2) विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असावी – पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली असावी.
3) शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे नेतृत्व गुण असणे आवश्यक आहे.
4) विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
5) विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न वर्षाला चार लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे :-

  1. S.S.C., H.S.C. मार्कशीटची प्रत. / डिप्लोमा अंतिम वर्ष, पदवीच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष ज्या उपलब्ध असतील त्या मार्कशीट (इंजिनियरिंग / मेडिसिन / माहिती तंत्रज्ञान / वास्तुकला / व्यवस्थापन / कला / मानवता / सामाजिक विज्ञान / कायदा या विषयांत द्वितीय वर्षात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी )
  2. S.S.C., H.S.C., पदवी मार्कशीटची प्रत (B.Ed कोर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी )
  3. फी रिसिप्ट
  4. कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा
  5. विद्यार्थ्याचे आधार कार्ड

टीप: प्रत्येक कागदपत्रांच्या प्रत्येक पानावर महाविद्यालयाचा शिक्का मारलेला असावा आणि संस्थाप्रमुख /उपमुख्य /विभाग प्रमुख यांची स्वाक्षरी असावी त्याचबरोबर त्यांचे नाव, पदनाम आणि मोबाईल क्रमांक कागदपत्रांच्या प्रत्येक पानावर नमूद केलेला असावा.

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही

अर्ज करण्याची पद्धत:-
1) विद्यार्थ्यांनी https://docs.google.com/forms/d/1Ow3nwuHWfKjxE5AUIM2g8wW5EpNqUTfpepsIAjXkpJg/viewform?edit_requested=true वर उपलब्ध ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे . 2) पुढे नमूद केलेल्या लिंकवर उपलब्ध अर्ज डाउनलोड करून संपूर्ण फील करावा https://docs.google.com/forms/d/1Ow3n/ 1m1zz_VIZUkOVBCSTlxqxm9fuaglpl6cc/view?usp=sharing आणि आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे भरलेला अर्ज प्रियदर्शनी अकादमीच्या खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्ट किंवा कुरिअरद्वारे पाठवा किंवा तुम्ही स्वतः अर्ज सादर करू शकता.
पत्ता- प्रियदर्शनी अकादमी, आर्केडिया बिल्डिंग, एनसीपीए मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई 400021

शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी 20 मार्च 202 रोजी जाहीर केली जाईल
(www.priyadarshniacademy.com वेबसाइटवर)

संपर्क माहिती:-
प्रियदर्शनी अकादमी, आर्केडिया बिल्डिंग, एनसीपीए मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई 400021
दूरध्वनी: ०२२२२८७३४५६ / ०२२६६३०७१६०
ईमेल: pa@priyadarshniacademy.com
वेबसाइट: www.priyadarshniacademy.com

शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंक:-
https://www.priyadarshniacademy.com/student-scholarships.php

ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://docs.google.com/forms/d/1Ow3nwuHWfKjxE5AUIM2g8wW5EpNqUTfpepsIAjXkpJg/viewform?edit_requested=true

अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक:-
https://drive.google.com/file/d/1m1zz_VIZUkOVBCSTlxqxm9fuaglpl6cc/view