ONGC क्रीडा शिष्यवृत्ती

या शिष्यवृत्ती बद्दल माहिती:

ही शिष्यवृत्ती ONGC कंपनीच्या कॉर्पोरेट स्पोर्ट्स डिव्हिजन मार्फत दिली जाते, ज्याचा उद्देश “तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंना” आर्थिक सहाय्य देणे आहे, जे खेळाडू प्रशिक्षण व स्पर्धांमध्ये सहभागासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात.

या शिष्यवृत्तीचा हेतू खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्राविण्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करता यावे आणि आर्थिक अडचणींपासून मुक्त ठेवणे हा आहे.

ही शिष्यवृत्ती दरवर्षी (आर्थिक वर्षानुसार) दिली जाते. इच्छुकांनी दरवर्षी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.

दरवर्षी सुमारे 250 खेळाडूंना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

एकूण शिष्यवृत्तीपैकी 50% शिष्यवृत्ती महिलांकरिता राखीव आहेत

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: २१ ऑक्टोबर २०२५

शिष्यवृत्ती रक्कम:

निवड झालेल्या खेळाडूंना दरमहा ₹15,000 ते ₹30,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते.

खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये ONGC चे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाऊ शकते. अशा वेळी त्यांना प्रवास भत्ता (TA/DA) तसेच सहभागासाठी लागणारा आवश्यक खर्च दिला जाईल.

ONGC कडून खेळाडूंना ₹५,००,०००/- (फक्त पाच लाख रुपये) इतक्या रकमेचे वैयक्तिक आरोग्य / अपघात विमा संरक्षण दिले जाईल, ज्यामध्ये आजारपण किंवा दुखापतीवरील खर्चाचा समावेश असेल. किंवा, खेळाडूंना स्वतःचा विमा घेण्याची परवानगी दिली जाईल, ज्यासाठी दरवर्षी ₹७,०००/- पर्यंतचा प्रीमियम ONGC कडून परत दिला जाईल.

पात्रता निकष:

शिष्यवृत्ती करता अर्ज करणाऱ्या खेळाडूचे वय 15 ते 20 वर्षां दरम्यान असावे. (ज्या खेळाडूंचा जन्मदिनांक १ एप्रिल २००५ ते १ एप्रिल २०१० दरम्यान आहे, ते अर्ज करण्यास पात्र आहेत.)

कौटुंबिक उत्पन्न: वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

फक्त भारतीय नागरिकत्व असलेले खेळाडू या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात

क्रीडा प्राविण्य: अर्जदाराने राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त स्पर्धेत भाग घेतलेला असावा.

इतर अटी: ONGC शिष्यवृत्ती कालावधीत इतर कोणतीही शिष्यवृत्ती / मानधन खेळाडूने घेऊ नये.

⦁ खेळाडू कोणत्याही ठिकाणी नोकरीवर नसावा.

⦁ खेळाडूने SAI, खेलो इंडिया, केंद्र / राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), फाउंडेशन / ट्रस्ट, बहुराष्ट्रीय / खाजगी संस्था यांच्याकडून कोणतीही शिष्यवृत्ती किंवा मानधन (स्टायपेंड) घेतलेले नसावे.

⦁ व्यावसायिक लीगमधून उत्पन्न मिळवणारे खेळाडू या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरणार नाहीत.

⦁ ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स, वर्ल्ड कप आणि वरिष्ठ श्रेणीतील जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून रोख पुरस्कार प्राप्त केलेल्या खेळाडूंना या शिष्यवृत्तीसाठी पात्रता राहणार नाही.

आवश्यक कागदपत्रे:

* जन्म प्रमाणपत्र / शाळा प्रमाणपत्र (वयाचा पुरावा)

* क्रीडा प्राविण्याचे प्रमाणपत्रे (राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय)

* पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

* वैध ओळखपत्र (आधार, पासपोर्ट इ.)

* बँक खाते तपशील

* इतर आवश्यक पुरावे (उदा. शाळा / महाविद्यालय ओळखपत्र)

अर्ज करण्याची पद्धती:– ऑनलाईन

शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहिती करिता खालील लिंक ला भेट द्या:

https://www.ongcindia.com/web/eng/sports-scholarship

शिष्यवृत्ती अर्ज करण्याकरिता लिंक:

https://sportsscholarship.ongc.co.in/register

संपर्क तपशील:

Plot No. 5A–5B, Nelson Mandela Road,

Vasant Kunj, New Delhi – 110070

दूरध्वनी: 011-26750998

फॅक्स: 011-26750991 / 26129091