ओएनजीसी फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-ओएनजीसी फाउंडेशन शिष्यवृत्ती ओएनजीसी फाऊंडेशनने सुरू केली आहे. ही शिष्यवृत्ती जनरल , SC/ST आणि OBC कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना दिली जाते. अभियांत्रिकी, एमबीबीएस,एमबीए पदवी आणि जिओफिजिक्स/जिओलॉजी कोर्समध्ये मास्टरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 48,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ₹ ४८,००० रुपये प्रति वर्षी

◆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ८ जुलै २०२३

◆ पात्र अभ्यासक्रम:-१ अभियांत्रिकी Engineering

२ एमबीए MBA

३ एमबीबीएस MBBS

४ मास्टर इन जिओफिजिक्स/जिओलॉजी कोर्स

◆ पात्रता निकष:-1) अभियांत्रिकी किंवा एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात किंवा भूविज्ञान / भूभौतिकी किंवा एमबीए या विषयातील पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

२) इंजिनीअरिंग किंवा एमबीबीएस पदवीअभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी १२वीच्या परीक्षेत किमान ६०% गुण मिळवले असणे आवश्यक आहे.

3) जिओलॉजी/जिओफिजिक्स/एमबीए मधील पीजी कोर्सेसच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेत किमान 60% किंवा 10 पैकी 6 OGPA/CGPA गुण मिळवले असणे आवश्यक आहे.

4) कौटुंबिक उत्पन्न मर्यादाएससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी – वार्षिक ४.५ लाखOBC आणि जनरल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी – वार्षिक 2 लाख

5) विद्यार्थ्याचे वय 1 मे 2023 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

◆ आवश्यक कागदपत्र:-1. जातीचे प्रमाणपत्र हिंदी/इंग्रजीमध्ये

2. वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा इयत्ता 10 वी गुणपत्रिका.

3. अभियांत्रिकी/एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या बाबतीत 12वीच्या गुणपत्रिकेची प्रत.

4. एमबीए/मास्टर्स इन जिओलॉजी/जिओफिजिक्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एकत्रित ग्रॅज्युएशन मार्कशीटची प्रत.

5. कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्राची हिंदी/इंग्रजीमध्ये प्रमाणित प्रत.

6. ईसीएस फॉर्ममध्ये अर्जदाराचे बँक तपशील बँकेने विहित केल्यानुसार प्रमाणित केले आहेत.

7. पॅन कार्डची प्रत किंवा पण कार्ड उपलब्ध नसल्यास पॅन कार्ड करीता अर्ज केलेली पावती

8. कॉलेज/संस्थेच्या आयडीची प्रत

9. महाविद्यालये/संस्थेच्या प्रवेश पावतीची प्रत

10.हमीपत्राचीप्रत.

https://drive.google.com/file/d/1B2ELGBMs64HrOCYcEI5WJTWginb1WtK-/view?usp=sharing

11. अर्जदाराचा फोटो

12. महाविद्यालयाकडून डिक्लरेशन –https://drive.google.com/file/d/1aFKgNeJ2SnV49xb5OjDjAc1d2mTp5N-o/view?usp=sharing

◆ टीप-शिष्यवृत्तीसाठी दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

◆ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-https://ongcscholar.org/#/schemeAndRules/apply

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या:-https://ongcscholar.org/#/fellowshipScheme

◆ संपर्क माहिती:-पत्ता:-ओएनजीसी फाउंडेशन,8वा मजला, कोअर III, स्कोप मिनार, लक्ष्मी नगर, दिल्ली-110092

दूरध्वनी: ०११-२२४०६८५६

ईमेल:scholarship2022@ongcfoundation.org

◆ वेबसाइट:- https://ongcscholar.org