एनएसडीएल शिक्षा सहयोग शिष्यवृत्ती (पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम)

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹12,000

◆ अंतिम तारीख:- 30/09/2021

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
एनएसडीएल शिक्षा सहयोग हा नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडचा उपक्रम आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम उच्च फीच्या संरचनेमुळे दर्जेदार शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. एनएसडीएल शिक्षण सहयोग शिष्यवृत्ती त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

◆ पात्रता निकष:-
१) विद्यार्थ्यांने पूर्णवेळ पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज केलेला असावा आणि मागील सर्व (१०वी, १२वी आणि पदवी/डिप्लोमा) शैक्षणिक वर्षात ६०%हुन अधिक गुण मिळवलेले असावेत.
२) मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली, बेंगलुरू येथील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
३) ३,००,०००/- हुन अधिक आर्थिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांच शिष्यवृत्ती मिळवता येईल.

◆ पात्र कोर्सेस:-
कोर्स स्तर : पदव्युत्तर पदवी
1) कोर्सचे नाव :
मास्टर ऑफ आर्टस् – एम.ए
मास्टर ऑफ सायन्स – एम.एससी
मास्टर ऑफ कॉमेर्स- एम.कॉम

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) ओळखीचा पुरावा
2) १०वी, १२वी आणि पदवीची गुणपत्रिका
3) विद्यार्थ्याचे बँक पासबुक.
4) प्रवेश मिळाल्याचे पत्र (पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी).
5) कॉलेज फी
6) संस्थेकडून प्राप्त बोनफाईड सर्टिफिकेट
7) पॅन क्रं/मतदान ओळखपत्र/पारपत्र
8) डोमासाईल सर्टिफिकेट
10) अर्जदाराचा फोटो
11) पत्त्याचा पुरावा
12) उत्पन्नाचा दाखला

◆ ऑनलाईन अर्जसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/114/430_4.html

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३
टेलिफोन: (०२२) ४०९०४४८४
फॅक्स: (०२२) २४९१५२१७
संपर्क करावयाच्या व्यक्तीचे नाव: राजदीप मुखर्जी
ई-मेल: vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाईट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *