नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून एसटी कॅटेगिरीमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ही शिष्यवृत्ती आदिवासी कार्य मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्र योजना आहे आणि दरवर्षी २० नवीन ST कॅटेगिरीमधील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पीएचडी, पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ शेवटची तारीख:- ३१ जुलै २०२३

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
1) वार्षिक आकस्मिकता आणि उपकरणे भत्ता
पुस्तके/आवश्यक उपकरणे/अभ्यास दौरा/टायपिंग आणि थीसिसचे बायडिंग इत्यादींसाठी वार्षिक आकस्मिकता आणि उपकरणे भत्ता अमेरिकेतील शिक्षणाकरिता $1532 (केवळ यूएस डॉलर्स एक हजार पाचशे बत्तीस) असेल आणि युनायटेड किंगडममधील शिक्षणाकरिता £ 1116 असेल (एक हजार एकशे सोळा पाऊंड ) इतर देशांमधील, शिक्षणाकरिता 1532 यूएस डॉलर भत्ता दिला जाईल..
2) वार्षिक देखभाल भत्ता
अमेरिकेतील शिक्षणाकरिता वार्षिक देखभाल भत्ता यूएस डॉलर 15,400 ($ पंधरा हजार चारशे फक्त) असेल आणि युनायटेड किंगडममधील शिक्षणाकरिता 9,900 पाउंड (फक्त नऊ हजार नऊशे) त्याचबरोबर इतर देशांतील शिक्षणाकरिता यूएस डॉलर 15,400 इतकी रक्कम दिली जाईल.
3) मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी देशांतर्गत होणारा प्रवास खर्च दिला जाईल.

4) परदेशात जाण्याकरिता आणि परत येण्याकरिताचा विमान प्रवासाचा इकॉनॉमी क्लासचा खर्च दिला जाईल.
5) Poll Tax
6) व्हिसा शुल्क- भारतीय रुपयांमध्ये व्हिसा शुल्क दिले जाईल.
7) आकस्मिक प्रवास खर्च – यूएस डॉलर 18.70 पर्यंत आकस्मिक प्रवास खर्च दिला जाईल.
८) फी :- अभ्यासक्रमाची जी काही शैक्षणिक फी असेल ती संपूर्ण फी दिली जाईल.
9) वैद्यकीय विमा प्रीमियमची जी काही रक्कम असेल ती रक्कम दिली जाईल.

◆ पात्र अभ्यासक्रम आणि अभ्यासाचे क्षेत्र & शिष्यवृत्यांची संख्या :-
पुढे नमूद केलेल्या क्षेत्रात पोस्ट-डॉक्टरेट संशोधन किंवा पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
इकोनॉमिक्स / फायनान्स / मॅनेजमेंट / Law – 04 शिष्यवृत्ती
प्युर सायन्स / अप्लाइड सायन्स / इंजिनीरिंग / Technology / Mathematics (STEM )- 10 शिष्यवृत्ती
ऍग्रीकल्चरल / मेडिसीन – 04 शिष्यवृत्ती
ह्युमॅनिटी / सोशल सायन्स / Fine Arta – 02 शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीचा कालावधी:-
1) पोस्ट-डॉक्टरेट संशोधन-दीड वर्षे
2) Ph.D साठी- 4 वर्ष
३) पदव्युत्तर पदवीसाठी – अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार १/२/३ वर्षे (एक/दोन/तीन वर्षे).

◆ पात्रता निकष:-
1) पोस्ट-डॉक्टरेट शिष्यवृत्तीसाठी: संबंधित पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.मध्ये किमान 55% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहे.
2) पीएचडी शिष्यवृत्तीसाठी: संबंधित पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहे.
3) पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्तीसाठी: संबंधित बॅचलर पदवीमध्ये किमान 55% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहे.
4) फक्त ST श्रेणी किंवा विशेषतः असुरक्षित आदिवासी गटातील ( Particularly Vulnerable Tribal Groups) विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
◆ शिष्यवृत्तीसाठी वयाचे निकष :-
1) पोस्ट-डॉक्टरेट शिष्यवृत्तीसाठी: ३८ वर्षे
२) पीएचडी शिष्यवृत्तीसाठी : ३५ वर्षे
३) पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्तीसाठी : ३२ वर्षे

◆ उत्पन्नाचे निकष :-
ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पन्न सर्व स्रोतांमधून रु.६,००,०००/- (केवळ सहा लाख रुपये) पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.
कौटुंबिक उत्पन्नाची गणना खालील पद्धतीने केली जाईल: –
1) ज्या विद्यार्थ्यांचे वडील आणि आई दोघेही काम करत असतील तर, त्यांच्या दोघांचे सर्व स्त्रोतांकडून एकत्रित उत्पन्न एकूण कौटुंबिक उत्पन्नाची गणना करताना विचारात घेतले जाईल.
2) जर कुटुंबातील इतर सदस्य, वडील आणि आई व्यतिरिक्त, कमावते सदस्य असतील तर, त्याच्या किंवा तिच्या उत्पन्नाचा एकूण कौटुंबिक उत्पन्नाच्या गणनेमध्ये समावेश केला जाणार नाही.
3) फक्त एकच पालक हयात असल्यास, एकूण कौटुंबिक उत्पन्न विचारात घेण्यासाठी त्या पालकाचे उत्पन्न विचारात घेतले जाईल. इतर भावंड किंवा कुटुंबातील सदस्य कमावते सदस्य असल्यास, त्यांचे उत्पन्न एकूण कौटुंबिक उत्पन्नाच्या गणनामध्ये समाविष्ट केले जाणार नाही.
4) एखाद्या अनाथाच्या बाबतीत, ज्याला पालकाद्वारे आधार दिला जातो, उत्पन्नाचे निकष लागू होणार नाहीत.
NOTE — (उत्पन्नाच्या निकषांबाबत)
1) उत्पन्नाची व्याख्या – उत्पन्नाचा अर्थ असा आहे की आयकर कायद्यात उपलब्ध असलेल्या सवलती आणि वजावटींशिवाय सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नासह एकूण उत्पन्न.
२) उत्पन्नाचे प्रमाणपत्र एकदाच देणे आवश्यक आहे, अर्थात अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी जे अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी वैध असेल.
3) प्रवेशाच्या वेळी दिलेला उत्पन्नाचा दाखला ज्या वर्षी प्रवेश घेतला आहे त्याच वर्षी घेतलेला असावा. पगारदार कर्मचाऱ्याच्या बाबतीत, पात्रतेच्या उद्देशाने मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न विचारात घेतले जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराने शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला, तर आर्थिक वर्ष २०२२-२०२३साठी कुटुंबाचे उत्पन्न आवश्यक असेल.

◆ टीप:-

  • शिष्यवृत्तीचा लाभ कुटुंबातील फक्त एका विदयार्थ्याला मिळू शकतो.
  • सर्व स्रोतांमधून उमेदवाराचे एकूण कौटुंबिक उत्पन्न रु. ६,00,000/- ( सहा लाख ) पेक्षा जास्त नसावे.
  • – कोणत्याही शाखेतील बॅचलर स्तरावरील अभ्यासक्रमा करीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • एकूण शिष्यवृत्तीपैकी ३०% शिष्यवृत्ती महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
  • बॅचलर/मास्टर्स पदवीमध्ये मिळालेल्या गुणांचे निकष त्या उमेदवारांना लागू होणार नाहीत ज्यांनी लेटेस्ट QS जागतिक क्रमवारीत पहिल्या 1,000 संस्थांमध्ये आधीच प्रवेश मिळवला आहे.
  • शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती करीता निवड झालेल्या तारखेपासून दन वर्षांच्या आत परदेशातील टॉप 1,000 रँक असलेल्या परदेशी संस्था/विद्यापीठांमध्ये (QS जागतिक क्रमवारीनुसार) प्रवेश घेणे आवश्यक आहे. अन्यथा निर्दिष्ट कालावधीची समाप्ती झाल्यावर, शिष्यवृत्ती आपोआप रद्द होईल.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) पासपोर्ट आकाराचा फोटो
2) 10वी बोर्ड प्रमाणपत्र
3) ST कॅटेगिरी प्रमाणपत्र
4) उत्पन्नाचा दाखला
5) (ITR/फॉर्म16), लागू असल्यास: मूल्यांकन वर्ष 2023-24
6) मार्कशीट
पोस्ट-डॉक्टरल शिष्यवृत्तीसाठी: पदव्युत्तर पदवी [एकत्रित ग्रेड शीटसह सर्व वर्षे/सेमिस्टर मार्कशीट] आणि पीएच.डी प्रदान केलेले प्रमाणपत्र.
पीएचडी शिष्यवृत्तीसाठी: पदव्युत्तर पदवी [एकत्रित ग्रेड शीटसह सर्व वर्षे/सेमिस्टर मार्कशीट]
पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्तीसाठी: पदवी [एकत्रित ग्रेड शीटसह सर्व वर्षे/सेमिस्टर मार्कशीट]

7) जर मार्कशीटवर नमूद केलेले गुण CGPA/OGPA/FGPA मध्ये असतील तर पेरसेन्टेज मध्ये कॉन्व्हर्ट करण्यासंबंधी डॉक्युमेंट
8) PVTG (विशेषतः असुरक्षित आदिवासी गट) प्रमाणपत्र – लागू असल्यास
9) पासपोर्ट साइज फोटो

◆ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

◆ शिष्यवृत्ती अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/1TYEecSJ1wKlvCapsPPhFIGT8q0ZfhvB7/view?usp=sharing

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://overseas.tribal.gov.in/AboutUs.aspx
https://overseas.tribal.gov.in/StudentsRegistrationForm.aspx

◆ शिष्यवृत्ती मार्गदर्शक तत्त्वे डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/1tOVZUrLcF1HHKEZiMCj2NVYG2ePVnG7K/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्ती सूचना पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/11MV9PzsmHWgllc8kuo_yDX2G__TTWQo5/view?usp=sharing

◆ डिजिलॉकर युजर मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/1WzpTXiLtPrCbio7oDDOyzTar1WIiAk6U/view?usp=sharing

◆ विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांची (PVTGs) राज्यवार यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक:-
https://drive.google.com/file/d/1sw-VT_lV_5SCgvdPk103-7oZWq4PQKI_/view?usp=sharing

◆ वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड करण्यासाठी लिंक:-
https://drive.google.com/file/d/19MtYPONS9kGd2DxRD8GnhoBgDTVAQwgs/view?usp=sharing

◆ संपर्क तपशील:-
संपर्क व्यक्ती: श्री. मनोज कुमार सिंग (उपसचिव-शिष्यवृत्ती विभाग)
फोन: ०११-२३३४०२७०
पत्ता: गेट क्रमांक ३, तळमजला, जीवन तारा बिल्डिंग, अशोका रोड, पटेल चौक, नवी दिल्ली -११००१
टेकनिकल तक्रारींकरिता संपर्क-
तक्रार करण्याकरिता : https://tribal.nic.in/Grievance
संपर्क क्रमांक : ०११-२३३४५७७०
ईमेल: fellowship-tribal@nic.in