नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप

अंतिम तारीख :- ३१ मार्च २०२३

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप बद्दल:- अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या-विमुक्त जमाती, भूमिहीन शेतमजूर यांची मुले आणि पारंपारिक कारागीरांची मुले अशा प्रवर्गातील कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विदेशात पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहाय्य केले जाते. यावर्षी एकूण १२५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून दिली जाते.

शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
1]वार्षिक देखभाल भत्ता-
15400 यूएस डॉलर- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि यूके वगळता इतर देशांमध्ये अभ्यासासाठी.
9900 ग्रेट ब्रिटन पाउंड- युनायटेड किंगडम (यूके) मध्ये अभ्यासासाठी.
2]आकस्मिक भत्ता
1500 यूएस डॉलर- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि यूके वगळता इतर देशांमध्ये अभ्यासासाठी.
1100 ग्रेट ब्रिटन पाउंड- युनायटेड किंगडम (यूके) मध्ये अभ्यासासाठी.
3] ट्यूशन फी
4]व्हिसा शुल्क –
5]वैद्यकीय विमा खर्च
6] इन्सिडेंटल प्रवास भत्ता आणि उपकरणे भत्ता
7] भारत ते विद्यापीठ किंवा संस्था आणि संस्था किंवा विद्यापीठ ते भारत प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी क्लासची हवाई तिकिटे खर्च.

शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रम:-
मास्टर्स डिग्री
पीएच.डी

शिष्यवृत्तीचा कालावधी:-
मास्टरसाठी जास्तीत जास्त ३ वर्षे.
पीएच.डी.साठी जास्तीत जास्त ४ वर्षे.

पात्रता निकष :-
1]फक्त 2023 च्या नवीनतम उपलब्ध QS रँकिंगनुसार टॉप 500 रँक असलेल्या परदेशी संस्था/विद्यापीठांमध्ये प्रवेशाची बिनशर्त ऑफर मिळवलेले विद्यार्थीच नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
2] केवळ पात्रता परीक्षेत किमान 60% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त केलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. पीएच. डी अभ्यासक्रमांसाठी, पात्रता परीक्षा ही पदव्युत्तर पदवी असेल आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी, पात्रता परीक्षा ही बॅचलर पदवी असेल.
3] केवळ अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
4] ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
5] कौटुंबिक उत्पन्न मर्यादा –
वर्षाला 8 लाख रुपये

आवश्यक कागदपत्रे :-
1]10वी बोर्ड प्रमाणपत्र
2]जातीचे प्रमाणपत्र
3]फोटो
4]स्कॅन केलेली स्वाक्षरी
5]वर्तमान पत्त्याचा पुरावा/कायम पत्ता पुरावा, वर्तमान पत्त्यापेक्षा भिन्न असल्यास
6]पात्रता पदवी/तात्पुरती प्रमाणपत्र
7] सर्व सेमीस्टर गुणपत्रिका
8]विदेशी विद्यापीठातील प्रवेशासंबंधीचे वैध दस्तऐवज (अर्ज, नोंदणी किंवा प्रवेश संबंधित डॉक्युमेंट्स)
9]सर्व कुटुंबातील सदस्यांची उत्पन्नाची कागदपत्रे
10]अर्जदार नोकरी करत असल्यास नियोक्त्याचे NOC प्रमाणपत्र. शिक्षणामध्ये पात्रता पदवी पूर्ण केल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र.
11] इन्कम टॅक्स रिटर्न एक्सेप्टन्स डॉक्युमेंट (ITR)
12]आधार कार्ड

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://nosmsje.gov.in/(X(1)S(thwg5skhtvued3pge1gbedb3))/Register.aspx

शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
https://nosmsje.gov.in/(X(1)S(thwg5skhtvued3pge1gbedb3))/Default.aspx
शिष्यवृत्ती नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
https://drive.google.com/file/d/1OqlDgALBt4jXxGJYzwq87_opNz8GLDhv/view?usp=drivesdk
FREQUENTLY ASKED QUESTIONS डाउनलोड करण्यासाठी :-
https://drive.google.com/file/d/1PdYaSicT1XrStyxXceJogXdmcPlOkGhm/view?usp=drivesdk
उत्पन्न प्रमाणपत्राचे स्वरूप डाउनलोड करण्यासाठी:-
https://drive.google.com/file/d/1P0c5TRFIGr3DoVJ8ctEDOEfdIY6tLAkF/view?usp=drivesdk
भूमिहीन शेतमजूर असल्याच्या प्रमाणपत्राचे फॉरमॅट डाउनलोड करण्यासाठी:-
https://drive.google.com/file/d/1OxHsaJoDhVkBA3LcMUUNF07_FLe0E9us/view?usp=drivesdk
◆ पारंपारिक कारागीर असल्याच्या प्रमाणपत्राचे स्वरूप डाउनलोड करण्यासाठी :-
https://drive.google.com/file/d/1Pl-G9hsVznFIeoxn7DauqApBCBfm6cvm/view?usp=drivesdk
◆ ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सूचना पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी :-
https://drive.google.com/file/d/1OiMdMsiEnqaXlmoB0L43OTwYfCzWHXOq/view?usp=drivesdk

◆ महत्वाच्या टीपा :-

  • QS रँकिंग संस्था/विद्यापीठ यांची माहिती पुढील लिंक वर दिली आहे:- https://www.topuniversities.com/universityrankings/world-university-rankings/2023
  • 30% शिष्यवृत्त्या महिला उमेदवारांसाठी राखीव आहे.
  • बॅचलर पदवी अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
  • राज्य सरकार, इतर एजन्सी किंवा स्वत:च्या निधीतून इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा वापर करून आधीच परदेशात राहून किंवा शिक्षण घेत असलेले किंवा पूर्ण केलेले विद्यार्थी नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • मार्कशीटवरील गुण सीजीपीएमध्ये दिलेले असतील तर सीजीपीएचे परसेंटेज मध्ये रूपांतर करण्याचा फॉर्म्युला नमूद केलेले प्रमाणपत्र.
  • एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
  • भारतीय संस्कृती/वारसा/इतिहास/सामाजिक अभ्यास या विषयावर आधारित विषय/अभ्यासक्रम यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्तीकरता पात्र नाहीत.

◆ संपर्क तपशील:-
संपर्क व्यक्ती: श्री संजय सिंह
पत्ता: गेट क्रमांक:-३, तळमजला, जीवन तारा बिल्डिंग, अशोका रोड, पटेल चौक, नवी दिल्ली -११००१
वेबसाइट :- https://tribal.nic.in/Grievance
संपर्क क्रमांक : 11-23345770
ईमेल :- so-nos-msje@gov.in