नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-

  • व्याजमुक्त कर्ज म्हणून पूर्ण शिष्यवृत्ती.
  • तज्ञांकडून व्यावसायिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन.
  • नरोतम सेखसारिया फाउंडेशन स्कॉलर्समध्ये नेटवर्किंगच्या संधी.

◆ शेवटची तारीख:- १६ मार्च २०२३

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती परदेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून पूर्ण आणि अंशतः शिष्यवृत्ती देते. नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती परदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या किंवा परदेशात पदव्यूत्तर पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ही मेरिटवर आधारित शिष्यवृत्ती आहे.

◆ पात्र अभ्यासक्रम:– कोणतेही पोस्ट-ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम

◆ पात्रता निकष:-
1) भारतीय विद्यार्थी,जे सध्या भारतात राहतात आणि ज्यांचे वय 31 जानेवारी 2023 पर्यंत 30 वर्षांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज केला आहे आणि विद्यापीठाकडून अजून प्रवेश निश्चित केले गेला नाही असे विद्यार्थीदेखील या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत. परंतु विद्यापीठाने प्रवेश निश्चित केला तरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.
3) मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी किंवा निकालाच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी देखील या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
4) फॉल सेमीस्टर 2023 पासून टॉप रँकिंग संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची योजना असलेले विद्यार्थी देखील या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) पदवीपूर्व अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिकांच्या साक्षांकित प्रती
२) उच्च शिक्षण घेण्याकरिता GRE, GMAT, CAT, GATE यांसारखी जर कोणती पात्रता परीक्षा दिली असेल तर त्याचे स्कोअर कार्डच्या साक्षांकित प्रती.
3) फी स्ट्रक्चर आणि ॲक्सेप्टन्स लेटर
4) रेफरन्स लेटर
5) जर इतर कोणत्या संस्था किंवा स्त्रोताकडून फीमध्ये सवलत किंवा शिष्यवृत्ती किंवा फंडिंग मिळत असेल तर त्याबाबतीत माहिती देणारे डॉक्युमेंट.
6) पालकांचे मागील आर्थिक वर्ष २०२१-२०२२ चे आयकर रिटर्न ( ITR )
7) पासपोर्टची साक्षांकित प्रत

टीप :-
शिष्यवृत्तीसाठी मुलाखत मे/जून 2023 मध्ये आयोजित केली जाईल.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील.

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://pg.nsfoundation.co.in/

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://webportalapp.com/sp/login/narotam_application_portal

◆ संपर्क तपशील:-
संपर्क- 8169640558
ईमेल- pgscholarship@nsfoundation.co.in