महात्मा ज्योतिबा फुले संशोधन फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:- 

या योजने अंतर्गत भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यामध्ये कोणत्याही विषयात पूर्णवेळ व नियमितरित्या पीएचडी करणाऱ्या महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग प्रवर्गीय (ओ.बी.सी.), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रीमिलेयर मधील उमेदवारांना पाच वर्षांकरिता  अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.

◆ अर्जदार:- पीएचडी करणारे विद्यार्थी

◆ फेलोशिप रक्कम:- ३१,००० प्रती महिना

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:- ३० जून २०२२

◆ पात्रता निकष:

१. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच इतर मागास प्रवर्गीय (ओ.बी.सी.), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.

२. उमेदवार उत्पन्नाच्या नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.

३. उमेदवारने पदव्युत्तर पदवी परीक्षा ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थामार्फत उत्तीर्ण केलेली असावी.

४. उमेदवाराने पीएचडी पदवी अभ्यासक्रम करण्याकरिता भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय/ संस्था येथे नोंदणी केलेली असावी. नोंदणी नसलेली व्यक्ती योजनेच्या लाभाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

५. उमेदवारास पीएचडी पदवी धारण करण्याकरिता यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोग / इतर सहाय्य करणाऱ्या संस्था / महाविद्यालय / संस्था / शासन यांचेकडून अर्थसहाय्य अथवा अधिछात्रवृत्ती मिळत असल्यास असे उमेदवार  या योजनेच्या लाभाकरिता पात्र राहणार नाही. (माहिती लपूवन चुकीचा लाभ घेतल्याचे आढळल्यास योग्य त्या कार्यवाहीस पात्र ठरतील)

६. ज्या उमेदवारांना सारथी कडून आर्थिक सहाय्य मंजुर झाले आहे ते विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

७. उमेदवार पीएचडी करीत असलेल्या कालावधीत कोणत्याही स्वरूपाचा पूर्णवेळ अथवा अर्धवेळ रोजगार स्वयंरोजगार करीत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य / मानधन /शिष्यवृत्ती घेत असल्यास असे उमेदवार या  योजनेचा लाभ  घेण्यास पात्र राहणार नाही.

८ ) दिनांक १ जानेवारी २०२१ ते अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ज्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयात पी.एच डी करीता नोंदणी करून Confirmation for PhD चे पत्र प्राप्त केलेले आहे असे उमेदवार या फेलोशिपचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

९) उमेदवाराकडे RRC/RAC कडून विषय मंजूर झाल्याचे पत्र प्राप्त झाले असणे आवश्यक आहे.

१०) ज्या उमेदवारांचे प्रवेश केवळ तात्पुरत्या ( प्रोव्हिजनल ) आहे असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. 

◆ अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

१. उमेदवाराचे आधार कार्ड

२. उमेदवाराचे PAN कार्ड

३. उमेदवाराचा रहिवासी दाखला

४. उमेदवाराचा जातीचा दाखला

५. उमेदवाराचे वैध नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र

६. उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र

७. उमेदवाराचे १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र

८. उमेदवाराचे पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र

९. उमेदवाराचे पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र

१०. उमेदवाराचे NET/SET / PET/M.Phil परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र (ज्या आधारावर पीएचडी करिता प्रवेश मिळवला आहे त्या परीक्षेची माहिती देणे अनिवार्य आहे.) ११. उमेदवाराने पीएचडी करिता प्रवेश घेतल्याची पावती १२. उमेदवारास विद्यापीठाने मार्गदर्शकाची नेमणूक केल्याबाबत पत्र (Guide Allotment Letter)

१३. मार्गदर्शकाने स्वीकृत केल्याबाबत पत्र (Guide Acceptance Letter)

१४. उमेदवारास RAC / RRC ने संशोधन प्रकल्पास दिलेल्या मान्यतेचे पत्र

१५. उमेदवाराचे पीएचडीकरिता नोंदणी पक्की झाल्याचे प्रमाणपत्र (Confirmation letter)

१६. RAC / RRC ने मान्यता दिलेला संशोधन सारांश – उमेदवार, मार्गदर्शक व RRC ने मंजूर केल्याच्या स्वाक्षरीसहित (Research Synopsis)

१७. संशोधन केंद्र प्राप्त झाल्याचे पत्र (Research Center Allotment letter)

१८. संशोधन केंद्रात संशोधनासाठी रुजू झाल्याचे पत्र (Research Center Joining Report)

१९. मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख यांचे संयुक्त प्रमाणपत्र (विहित नमुन्यात)

२०. दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)

२१. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा (Change in Name Gazzette) (असल्यास)

२२. रद्द करण्यात आलेला धनादेश (Cancelled Cheque)

२३. रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत नसल्याबाबत व अधिछात्रवृत्ती मिळत नसल्याबाबत रु.५००/ च्या Stamp पेपरवर दंडाधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र.

◆ महत्वाचे :-

१. रुजू प्रमाणपत्र – लाभार्थ्याने विद्यापीठ / संस्था/ महाविद्यालयाचे रुजू प्रमाणपत्र (मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे) इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत महाज्योतीस सादर करावे, जे उमेदवार अंतिम निवड होण्याआधी रोजगार करीत असतील त्यांनी रोजगार करीत असलेल्या आस्थापनेने कार्यमुक्त केल्याचा अहवाल रुजू प्रमाणपत्र सोबत सादर करावा. 

२. अर्धवार्षिक प्रगती अहवाल – लाभार्थ्याने संशोधनाचा प्रगती अहवाल नोंदणीच्या दिनांकापासून दर ६ महिन्यांनी सादर करणे आवश्यक आहे.

३. मुदतवाढ प्रमाणपत्र – विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यांनी पीएचडी करिता मुदतवाढ दिली असल्यास मुदतवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

४. हजेरी प्रमाणपत्र – मार्गदर्शकांकडून हजेरी प्रमाणपत्र प्रमाणित करून देणे बंधनकारक आहे. 

◆ ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक:-

https://phdmis.mahajyoti.org.in/phd_2022/login_check/login.php

◆ संपर्क तपशील :- 

ईमेल: fellowshipmahajyoti@gmail.com

मोबाईल:  8956775376, 8956775377, 8956775378, 8956775379, 8956775380

वेबसाईट – https://mahajyoti.org.in