महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती

( परदेशात उच्च शिक्षणासाठी )

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
महाराष्ट्र शासनाच्या सारथी या महामंडळामार्फत महाराष्ट्रातील मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती या वर्षांपासून दिली जाणार आहे. पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका (पी जी डिप्लोमा ), त्याचबरोबर PHD चे शिक्षण घेण्याकरिता हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाकरिता महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

◆ शेवटची तारीख:-
ऑनलाईन अर्ज करून डॉक्युमेंट अपलोड करण्याची अंतिम तारीख – १ सप्टेंबर २०२३
संपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसहित सारथी संस्थेच्या पत्त्यावर पोहोचवण्याची अंतिम तारीख :- ४ सप्टेंबर २०२३

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
– विद्यापीठाची शिक्षण फी पूर्ण रक्कम
– वार्षिक निर्वाह निधी अमेरिकेत शिक्षणासाठी & Another Country (Excluding UK) १५,४०० यु.एस. डॉलर तर UKमध्ये शिक्षणासाठी ९९०० पौड
– विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी इकॉनोमी क्लासचा विमान प्रवासाचा खर्च
– वैयक्तिक आरोग्य विमा खर्च
पीएचडी- जास्तीत जास्त ४० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
पदव्युत्तर पदवी & पदव्युत्तर पदविका – जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.

◆ शिष्यवृत्ती कालावधी:

पीएचडी- चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
पदव्युत्तर पदवी – दोन वर्षे किंवा प्रत्यक्ष काय अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
पदव्युत्तर पदविका – एक वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी

◆वयोमर्यादा :-
पदव्युत्तर पदवी किंवा पदविका – जास्तीत जास्त ३५ वर्षे
PHD – जास्तीत जास्त ४० वर्षे

◆ शैक्षणिक पात्रता:-
१) परदेशातील विद्यापीठात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
२) परदेशातील विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएचडी ( Post Graduation Diploma, Post Graduation and Phd )
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि फार्मसी मध्ये

◆ विषय आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्यांची संख्या :-
आर्ट्स – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०४, पीएचडी अभ्यासक्रम-०५
कॉमर्स / अर्थशास्र – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०४, पीएचडी अभ्यासक्रम-०५
सायन्स – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- १०, पीएचडी अभ्यासक्रम-०५
इंजिनीरिंग – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- २०, पीएचडी अभ्यासक्रम-०५
मॅनेजमेन्ट – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०२, पीएचडी अभ्यासक्रम-०१
लॉ (कायदा )- पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०४, पीएचडी अभ्यासक्रम-०१
आर्किटेक्चर – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०४, पीएचडी अभ्यासक्रम-०२
फार्मसी – – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०२, पीएचडी अभ्यासक्रम-०१

◆ पात्रता निकष:-
१) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
२) शैक्षणिक वर्ष ( 2023-2024 ) मध्ये पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी करिता प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन 2023 QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.
३) उमेदवाराच्या पालकांचे / कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील ( 2022-2023 मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे
४) उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
५) हि शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्रातील मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे.

◆ परदेश शिष्यवृत्तीकरीता मंजूर करण्यात येणारे अभ्यासक्रम & पात्रता निकष :-
Engineering – Permissible Courses: P.G/P.G DIPLOMA /Ph.D

  1. Civil Engineering
  2. Mechanical Engineering
    3.Electrical Engineering
    4.Chemical Engineering
    5.Computer Engineering
    6.Production Engineering
    7.Industrial Engineering
    8.Environmental Engineering
  3. Marine Engineering
    10 Petrochemical Engineering
    11.Electronic & TC Engineering
    12.Information Engineering
    13 BIO-Technology Engineering
    14 Genetic Engineering
    १५ नॅनो टेकनॉलॉजि
    १६ इंडस्ट्री इंटरनेट ऑफ थिंग IIOT
    १७ सायबर लॉ / सायबर सिक्युरीटी
    १८ बायो मेडिकल इंजिनीरिंग

Management- Permissible Courses P.G/P.G DIPLOMA /Ph.D
1.MBA, With Finance / Marketing / H R / System Analysis
2.Hotel Management

Science – Permissible Courses P.G/P.G DIPLOMA /Ph.D
1.Agriculture

  1. Horticulture
    3 Animal Husbandary
    4 General Science
    5 Maths
    6 Physics
    7 Chemistry
    8 Zoology
    9 Botony
    10 Architecture

Arts & Commerce – Permissible Courses P.G/P.G DIPLOMA /Ph.D
1.Sociology
2.Psychology
3 Philosophy
4 Economics
5 Commerce
६ अप्लाइड आर्टस्
७ फाईन आर्टस्

फार्मसी – Permissible Courses P.G/P.G DIPLOMA /Ph.D
एम. फार्म

Law- Permissible Courses P.G/P.G DIPLOMA /Ph.D
Courses after L.L.M.

आर्किटेक्चर :- Permissible Courses P.G/P.G DIPLOMA /Ph.D

◆ आवश्यक कागदपत्रे:-
सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. :
१) विहीत नमुन्यातील अर्ज.
२) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचा दाखला. ( जातीचा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा EWS दाखला ) त्याच बरोबर मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात पडताळणी दाखला.
३) उत्पन्नाचा दाखला. व फॉर्म नुंबर १६ व ITR
विवाहित महिला उमेदवारांचे बाबतीत पतीकडील वार्षिक तहसीलदार याचे उत्पन्नाचे कागदपत्रे जोडावीत.
४) पदव्युत्तर पदविका & पदव्युत्तर पदवी – पदवी प्रमाणपत्र सर्व गुणपत्रक / Transcript सह
पीएचडी- पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र सर्व गुणपत्रक / Transcript सह
( Degree Certifivate / मार्क लिस्ट ALL SEMISTERS ).
५) परदेशातील क्यू.एस जागतिक मानांकन २०० पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विना अट ऑफर लेटर. (UNCONDITIONAL OFFER LETTER).
USA शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी F-1 (I-20 Certificate)
संबंधित विद्यापीठाचे नाव असलेले QSWR List (छायांकित प्रत) स्वसाक्षांकित
६) Statement of purpose/ निबंध (मुळ प्रत) (Only for PH.D.)
७) विद्यापीठाच्या महितीपत्र (Prospectus) सर्व पानांची प्रत
८) रु.500/- च्या स्टैंप पेपरवर बंधपत्र (मुळ प्रत ) (निवडीनंतर दिले तरी चालेल) रु.500/- च्या स्टंप पेपरवर हमीपत्र (मुळ प्रत निवडीनंतर दिले तरी चालेल)
९) इ. 10 वी व 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र
१०) दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र (मुळ प्रत)
११) आई वडील विभक्त असल्यास न्यायालयाचे संबंधित कागदपत्र
१२. विवाहित महिला अर्जदार पतीपासून विभक्त असल्यास न्यायालयाचे संबंधित कागदपत्र
१३. परदेशातील वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक विद्यापीठाचे लेटर
१४. वडील हयात नसल्यास मृत्यू दाखला
१५. विद्यार्थ्यांचे Pan Card
१६. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे (Domicile Certificate) प्रमाणपत्र,
१७. रेशनकार्ड
१८. पासपोर्टची प्रत
१९ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
२०. GRE / TOFEL/IELTS / इत्यादी आवश्यक परिक्षा उत्तीर्ण असलेबाबतचा पुरावा,
२१ विद्यार्थ्यांचे वयासंबंधीचे प्रमाणपत्र ( शाळा सोडल्याचा दाखला, डोमेसाइल दाखला, दहावी बोर्ड सर्टिफिकेट)

◆ महत्वाचे:-
१) एका कुटुंबातील फक्त एका विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
२) एक्झिक्यूटिव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झिक्युटिव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांकरता प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही.

◆ अर्ज करण्याची पध्दत :-
ऑनलाईन & फिजिकली डॉक्युमेंट सबमिट करणे –
पुढे दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा, अर्जाची प्रिंट कागदपत्रांसहित “ छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411 004.” या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा किंवा स्वतः पत्त्या वर जाऊन सबमिट करावी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :- https://sarthifs.sarthi-maharashtragov.in/
अर्ज डाउनलोड करण्याकरिता लिंक : https://drive.google.com/file/d/1tP1YYHquOZtWNnm7edS3Ku0qCB6tn5Ry/view?usp=sharing
◆ हमीपत्र डाउनलोड करण्याकरिता लिंक :-
https://drive.google.com/file/d/1rOae4c0x29qBUck8JmeV6rVaN6Bpn5Gy/view?usp=sharing
◆ बंधपत्र डाउनलोड करण्याकरिता लिंक :-
https://drive.google.com/file/d/1Upj0hUJrcWv9YZlvMiRw2wOpI0Ds9han/view?usp=sharing
◆ आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1QqIo38ihl2Z3qdlrIcJOUwSZ5ItAlBii/view?usp=sharing
◆ शिष्यवृत्ती माहिती पुस्तिका डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1HB1b3nC6Hq6pBCMqFACQbWgYQ7CUgFHn/view?usp=sharing
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/2.pdf

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411 004.
ईमेल- sarthiskvdept@gmail.com
संपर्क क्रमांक – 020-25592502