लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती  

Lila-Poonawalla-Foundation-Scholarship-Marathi-BSC

( पुण्यामध्ये बीएससीच्या  शिक्षणाकरिता )

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ०९/०९/२०२२

◆ फाउंडेशनच्या पत्त्यावर अर्ज आणि कागदपत्रांची हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख :- १२/०९/२०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल :-
लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती फक्त पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दिले जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींची गुणवत्ता आणि आर्थिक गरज यावर आधारित दिली जाते.

◆ शिष्यवृत्ती लाभ :- रु. 50,000/- प्रति वर्षी

◆ पात्रता निकष :-
१) लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी फक्त मुलीच पात्र आहेत
२) कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लीकेशन, मॅथेमॅटिक्स या विषयातील बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थिनी लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता पात्र आहेत.
3) पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात शिकणाऱ्या मुली लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
4) 10वी, 12वी मध्ये किमान 70% गुण मिळवलेल्या केवळ मुलीच लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) वयाचा पुरावा. ( जन्माचा दाखला /पॅन कार्ड )
२) आधार कार्ड
३) लिव्हिंग सर्टिफिकेट
4) मार्कशीट – (10वी, 12वी )
5) महाविद्यालयाकडून बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळालेले पत्र / अलॉटमेंट लेटर
६) प्रवेश परीक्षेचा निकाल ( उपलब्ध असल्यास अनिवार्य नाही )
7) गॅप सर्टिफिकेट (तुमच्या शिक्षणात गॅप असल्यास)
8) कुटुंबातील सर्व कमावत्या सदस्यांचा उत्पन्नाचा पुरावा (मागील वर्षाची आयटी असेसमेंट ऑर्डर, जर आयटी रिटर्न्स नसेल आणि पालक नोकरी करत असेल तर एम्प्लॉयरकडून पगाराचे प्रमाणपत्र किंवा शेवटच्या तीन महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स. जर आयटी रिटर्न नसेल आणि पालक नोकरी करत नसेल तर फक्त उत्पन्नाचा दाखला )

◆ टीप :-

  • विद्यार्थिनीच्या कुटुंबाचेएकूण कौटुंबिक उत्पन्न रु. 3.5 लाखपेक्षा जास्त नसावे.
  • लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी वयोमर्यादा वीस वर्षे आहे.
  • लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती ही मेरिट-कम-नीड बेस्ड स्कॉलरशिप आहे.
  • अर्जाची फी ३०० रुपये इतकी आहे (ऑनलाइन पेमेंट)

◆ शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया ;-
1 ऑनलाइन अर्ज
2 उमेदवारांनी वैयक्तिकरित्या लिला पूनावाला फाउंडेशन कार्यालयाच्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करण्यासाठी जाणे आवश्यक आहे.

◆ शिष्यवृत्ती माहिती पुस्तक डाउनलोड करण्यासाठी (खालील लिंकवर क्लिक करा):-
https://drive.google.com/file/d/1hI71Z1y7QMBsaGmo5uoWHPpHBc8uczsO/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी लिंक :- ( if link not openining, then copy the link and paste on goggle browser)
https://lpfscholarship.com

◆ संपर्क :-

ईमेल: lpfpunescholarship@lilapoonawallafoundation.com

पत्ता:-
लिला पूनावाला फाउंडेशन,
फिल व्हिला, 101/102, सर्व्हे नंबर 23, बालेवाडी, डी-मार्ट जवळ, बाणेर, पुणे-411045
संपर्क व्यक्ती: श्रीमती. विदुला / श्रीमती माधुरी / श्रीमती अस्मिता
संपर्क क्रमांक: ०२०-२७२२ ४२६५
मोबाईल :- ८६६९ ९९८९ ८१ / ८६६९ ९९८९ ८२
(कृपया सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत संपर्क साधा)

वेबसाइट :- www.lilapoonawallafounadtion.com