◆ शेवटची तारीख:- १ डिसेंबर २०२२
◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-
– दिल्ली विद्यापीठ किंवा जामिया मिलिया इस्लामियामधील कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क
– पुस्तके आणि स्थानिक वाहतुकीसाठी भत्ता
– दिल्ली बाहेरच्या विद्यार्थ्यांना घरभाडे भत्ता
– लॅपटॉप आणि डोंगल्स
◆ फेलोशिप बद्दल:-
KARM फेलोशिप हा उज्ज्वल तरुण महिलांना त्यांच्या व्यावसायिक ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. KARM फेलोशिप दिल्ली विद्यापीठ किंवा जामिया मिलिया इस्लामिया येथे कोणत्याही पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.
◆ पात्रता निकष:-
1) सध्या 12 वी मध्ये शिकत असलेल्या आणि दिल्ली विद्यापीठ किंवा जामिया मिलिया इस्लामिया येथून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुली कर्म फेलोशिपकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थिनींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनी कर्म फेलोशिपकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
◆ टीप:-
कर्म फेलोशिपकरीता अर्ज करण्यासाठी कोणतेही शैक्षणिक किंवा आर्थिक निकष नाहीत
◆ आवश्यक कागदपत्रे:-
1 विद्यार्थिनीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
2 विद्यार्थिनीचे आधार कार्ड.
3 इयत्ता 9वी मार्कशीट.
4 इयत्ता 10वी मार्कशीट.
5 इयत्ता 11वी मार्कशीट.
6 अर्जदाराच्या वडिलांचे / आईचे / पालकांचे आर्थिक उत्पन्न पुरावे (इन्कम टॅक्स रिटर्न, पे स्लिप्स, बँक खाते स्टेटमेंट )
७ महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलांचे प्रमाणपत्र ( फॉरमॅट खालील लिंकवर उपलब्ध आहे)
https://drive.google.com/file/d/1XCLF73B55BHSg_WsqZs-uG0UvSTkzNou/view?usp=sharing
◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
1 ऑनलाईन अर्ज – 15 सप्टेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2022.
2 मुलाखती – जानेवारी/फेब्रुवारी 2023 मध्ये
3 अंतिम निवड – 12वी बोर्डाच्या निकालानंतर, CUET निकाल आणि दिल्ली विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया प्रवेश प्रक्रियेनंतर
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://karmtrust.org/app/index.php
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://karmtrust.org/app/login.php
◆ तुम्हाला काही प्रश्न असल्यास खालील लिंकवर उपलब्ध FAQ विभागाला भेट द्या:-
https://karmtrust.org/app/faq.html
◆ संपर्क तपशील:-
ईमेल- info@karmtrust.org