एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बीइ, बीटेक कोर्सकरिता

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३१ जानेवारी २०२३

◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ५०,०००/- (पन्नास हजार रुपये)

◆ शिष्यवृत्ती बद्दल :-
ही शिष्यवृत्ती एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीद्वारे कोणत्याही इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाना दिली जाते.

◆ पात्रता निकष: –
१) ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ५०% गुण प्राप्त केले आहेत आणि बीइ किंवा बीटेक अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

◆ आवश्यक कागदपत्रे : –
१) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
३) 10 वी, 12 वी,डिप्लोमा मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक वर्षांची मार्कशीट
५) उत्पन्नाचा दाखला / सॅलरी सर्टिफिकेट / आयटीआर
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) बोनाफाईड प्रमाणपत्र
८) चालू वर्षाची महाविद्यालयीन फी पावती / फी स्ट्रक्चर – (ट्युशन व नॉन-ट्यूशन)

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/204/903_7.html

◆ टीप:-
1) शिष्यवृत्तीसाठी राजस्थानमधील रहिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
२) शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

◆ संपर्क तपशील: –
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई – 400 013.
दूरध्वनी – (022) 4090 4484
फॅक्स – (022) 2491 5217
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

वेबसाइटhttps://www.vidyasaarathi.co.in/