महाराष्ट्र शासन  उच्च व तंत्र शिक्षण विभाग परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

◆  महाराष्ट्र शासन  उच्च व तंत्र शिक्षण विभाग परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ◆

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-

– शिक्षण फी

– निर्वाह भत्ता

– विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि  अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत  येण्यासाठी  इकॉनोमी क्लासचा विमान प्रवासाचा खर्च

– वैयक्तिक आरोग्य विमा खर्च

◆ शेवटची तारीख:- 22 जुलै, 2022

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी, THE (TIMES HIGHER EDUCATION- टाइम्स हायर एज्युकेशन) किंवा QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग  २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ शिष्यवृत्ती कालावधी

पीएचडी- चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो

पदव्युत्तर पदवी – दोन वर्षे किंवा प्रत्यक्ष  अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो

पदव्युत्तर पदविका – 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो

◆ शैक्षणिक पात्रता:-

१) परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

२) पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणांसह पदवीत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

◆ पात्र अभ्यासक्रम:-

पदव्युत्तर पदविका,  पदव्युत्तर पदवी,  पीएचडी ( Post Graduation Diploma, Post Graduation and Phd ) आर्ट्स, कॉमर्स,  सायन्स,  मॅनेजमेंट,  लॉ अभ्यासक्रम,   इंजीनियरिंग,  आर्किटेक्चर आणि  फार्मसी या क्षेत्रांत

◆ पात्रता निकष:-

१) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असावेत.

२) शैक्षणिक वर्ष ( 2022-2023 ) मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन 2022 मधील THE (TIMES HIGHER EDUCATION- टाइम्स हायर एज्युकेशन) किंवा QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग  २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.

३) उमेदवाराच्या पालकांचे / कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील  ( 2021-2022 मधील)  एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा जास्त नसावे

४) दिनांक एक जुलै रोजी उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

५) हि शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

१) विद्यार्थ्यांच्या वयासंबंधीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला डोमासाईल किंवा एस एस सी सर्टिफिकेट

२) इयत्ता दहावी गुणपत्रिका

३) इयत्ता दहावी बोर्ड सर्टिफिकेट

४) इयत्ता बारावी गुणपत्रिका

५) दहावी बोर्ड सर्टिफिकेट

६) पदवी गुणपत्रिका

७) पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका

८) पदवी  प्रमाणपत्र

९)  पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र

१०) जीआर इ  स्कोर कार्ड

११) TOFEL / IELTS स्कोर कार्ड

१२) विद्यार्थी नोकरी करत असल्यास कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र

१३) विद्यार्थी नोकरी करत असल्यास त्याचा फॉर्म नंबर 16

१४) विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म

१५) कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळून वर्ष २०२१- २०३३ करिताचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला

१६) परदेशातील विद्यापीठाची मूळ विनाअट प्रवेश पत्र ( अन कंडिशनल ऑफर लेटर )

१७) USA मधील विद्यार्थ्यांसाठी F-१ (I-२० certificate ) उपलब्ध असल्यास

१८) परदेशातील विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक ( विद्यापीठाचे पत्र )

१९) आधार कार्ड

२०) रेशन कार्ड

२१) वडील हयात नसल्यास मृत्यूचा दाखला

२२) आई-वडील विभक्त असल्यास न्यायालयाची संबंधित कागदपत्रे

२३) विद्यापीठाच्या माहितीच्या ( Prospectus )  संबंधित पानांची  प्रत

२४) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न भारतातील बँक खात्याची माहिती ( चेक बुक किंवा पासबुक )

२५) विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य चांगले असल्याचे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र

२६) पासपोर्ट

२७) महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट

२८) विद्यार्थ्याचे आई-वडील अथवा आई-वडील हयात नसल्यास आणि पालक असल्यास पालकांचा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट

२९) जर विद्यार्थ्याचे मार्क्स ग्रिड किंवा पॉइंटर मध्ये मार्कशीट वरती दिले असतील तर ग्रेड स वरून किंवा पॉईंटवरून टक्केवारी काढण्यास संदर्भातील संबंधित बोर्डाचा किंवा विद्यापीठाचा फोर मिला किंवा संबंधित लेटर

३०) व्हिसा ची प्रत

३१) दोन भारतीय नागरिकांचे जामीन पत्र ( अंतिम निवड झाल्यानंतर सादर करावे लागतील )

◆ महत्वाचे

१) एका कुटुंबातील फक्त एका विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.

२) एक्झिक्यूटिव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झिक्युटिव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांकरता प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही.

३) या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनी घेतलेली नसावे तसेच त्याने अन्य प्रशासन विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

◆ शिष्यवृत्ती संबंधी GR डाउनलोड करण्याकरिता लिंक :-

https://drive.google.com/file/d/16Ie9aJqT74yV-k771gqlrdu-BGr_HYPU/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्ती माहिती पुस्तिका डाउनलोड करण्याकरिता लिंक:-

https://drive.google.com/file/d/1_fcd93JR6zNaUk-cN8S00afMZvF7TazY/view?usp=sharing

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-

https://foreignscholarship2022.dte.maharashtra.gov.in

◆ संपर्क तपशील:-

पत्ता- Directorate Of Technical Education ,Maharashtra State,
Mumbai 3, Mahapalika Marg, Post Box No.1967,
Opp. Metro Cinema, Mumbai – 400 001

ईमेल- desk17@dtemaharashtra.gov.in

वेबसाईट: https://dte.maharashtra.gov.in

मोबाईल-  8104722711