महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-

  • शिक्षण फी
  • निर्वाह भत्ता
  • विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी इकॉनोमी क्लासचा विमान प्रवासाचा खर्च
  • वैयक्तिक आरोग्य विमा खर्च

◆ शेवटची तारीख:- 12 जुलै, 2023

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी, THE (TIMES HIGHER EDUCATION- टाइम्स हायर एज्युकेशन) किंवा QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ शिष्यवृत्ती कालावधी
पीएचडी- चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो
पदव्युत्तर पदवी – दोन वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो
पदव्युत्तर पदविका – 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो

◆ शैक्षणिक पात्रता:-
१) परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
२) पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएचडी ( Post Graduation Diploma, Post Graduation and Phd ) आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि फार्मसी या क्षेत्रांत

◆ विषय आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्यांची संख्या :-
आर्ट्स – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०१, पीएचडी अभ्यासक्रम-०१
कॉमर्स – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०१, पीएचडी अभ्यासक्रम-०१
सायन्स – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०१, पीएचडी अभ्यासक्रम-०१
इंजिनीरिंग / वास्तुकला शास्त्र – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०४, पीएचडी अभ्यासक्रम-०४
मॅनेजमेन्ट – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०१, पीएचडी अभ्यासक्रम-०१
औषधनिर्माणशास्त्र – पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०१, पीएचडी अभ्यासक्रम-०१
लॉ (कायदा )- पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- ०१, पीएचडी अभ्यासक्रम-०१

◆ परदेश शिष्यवृत्तीकरीता मंजूर करण्यात येणारे अभ्यासक्रम & पात्रता निकष :-
Engineering – Permissible Courses: P.G/Ph.D.

  1. Civil Engineering
  2. Mechanical Engineering
    3.Electrical Engineering
    4.Chemical Engineering 5.Computer Engineering
    6.Production Engineering
    7.Industrial Engineering
    8.Environmental Engineering
  3. Marine Engineering
    10 Petrochemical Engineering
    11.Electronic & TC Engineering
    12.Information Engineering
    13 BIO-Technology Engineering
    14 Genetic Engineering
    Eligibility Criteria – Graduation for PG & Post Graduation for Ph.D.
    Medical- Permissible Courses: P.G.
    1.M.D
  4. M.S
    Eligibility Criteria – Graduation in Medical Sciences
    Management- Permissible Courses P.G/Ph.D
    1.MBA, With Finance / Marketing / H R / System Analysis
    2.Hotel Management
    Eligibility Criteria –
    Science – Permissible Courses P.G/Ph.D
    1.Agriculture
  5. Horticulture
    3 Animal Husbandary
    4 General Science
    5 Maths
    6 Physics
    7 Chemistry
    8 Zoology
    9 Botony
    10 Architecture
    Arts & Commerce – Permissible Courses P.G/Ph.D
    1.Sociology
    2.Psychology
    3 Philosophy
    4 Economics
    5 Commerce
    Arts- Permissible Courses P.G/Ph.D
    1 Fine Arts
    2 Film Making
    3 Design
    4 Animation
    Law- Permissible Courses P.G/Ph.D
    Courses after L.L.M.

◆ पात्रता निकष:-
१) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
२) शैक्षणिक वर्ष ( 2023-2024 ) मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन 2023 मधील THE (TIMES HIGHER EDUCATION- टाइम्स हायर एज्युकेशन) किंवा QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.
३) उमेदवाराच्या पालकांचे / कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील ( 2022-2023 मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
४) दिनांक एक जुलै रोजी उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
५) हि शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे.

◆ अर्ज करण्याची पद्धती :-
१ पुढे नमूद केलेल्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करणे
२ वरती नमूद केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व त्यासोबत जोडण्यात आलेल्या आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्र यांच्या साक्षांकित प्रति सह मूळ प्रमाणपत्र व कागदपत्र यांचे पडताळणी करिता खाली नमूद केलेल्या नजीकच्या संबंधित कोणत्याही सहसंचालक विभागीय कार्यालयात विहित कालावधीत सादर करणे.
( जर अर्ज करणारा विद्यार्थी, प्रिंट केलेला अर्ज व डॉक्युमेंट सबमिट करण्याकरता तसेच पडताळणी करिता स्वतः तंत्र शिक्षण विभागाच्या कार्यालयात, विभागीय कार्यालयात किंवा सहसंचालकांच्या कार्यालयात उपलब्ध राहू शकणार नसेल तर अशा परिस्थितीत असे विद्यार्थी त्याच्या पालकास किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीस अथॉरिटी लेटर देऊन आपला अर्ज सादर करू शकतात.)

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्यांच्या वयासंबंधीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला डोमासाईल किंवा एस एस सी सर्टिफिकेट
२) इयत्ता दहावी गुणपत्रिका
३) इयत्ता दहावी बोर्ड सर्टिफिकेट
४) इयत्ता बारावी गुणपत्रिका
५) दहावी बोर्ड सर्टिफिकेट
६) पदवी गुणपत्रिका
७) पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका
८) पदवी प्रमाणपत्र
९) पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
१०) जीआर इ स्कोर कार्ड
११) TOFEL / IELTS स्कोर कार्ड
१२) विद्यार्थी नोकरी करत असल्यास कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र
१३) विद्यार्थी नोकरी करत असल्यास त्याचा फॉर्म नंबर 16
१४) विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म
१५) कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळून वर्ष २०२२- २०३३ करिताचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
१६) परदेशातील विद्यापीठाची मूळ विनाअट प्रवेश पत्र ( अन कंडिशनल ऑफर लेटर )
१७) USA मधील विद्यार्थ्यांसाठी F-१ (I – २० certificate ) उपलब्ध असल्यास
१८) परदेशातील विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक ( विद्यापीठाचे पत्र )
१९) आधार कार्ड
२०) रेशन कार्ड
२१) वडील हयात नसल्यास मृत्यूचा दाखला
२२) आई-वडील विभक्त असल्यास न्यायालयाची संबंधित कागदपत्रे
२३) विद्यापीठाच्या माहितीच्या ( Prospectus ) संबंधित पानांची प्रत
२४) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न भारतातील बँक खात्याची माहिती ( चेक बुक किंवा पासबुक )
२५) विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य चांगले असल्याचे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र
२६) पासपोर्ट
२७) महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट
२८) विद्यार्थ्याचे आई-वडील अथवा आई-वडील हयात नसल्यास आणि पालक असल्यास पालकांचा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट
२९) जर विद्यार्थ्याचे मार्क्स GRADE किंवा पॉइंटर मध्ये मार्कशीट वरती दिले असतील तर ग्रेडवरून किंवा पॉईंटवरून टक्केवारी काढण्यास संदर्भातील संबंधित बोर्डाचा किंवा विद्यापीठाचा FORMULA किंवा संबंधित लेटर
३०) व्हिसा ची प्रत
३१) दोन भारतीय नागरिकांचे जामीन पत्र ( अंतिम निवड झाल्यानंतर सादर करावे लागतील )
३२) विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा दाखला (डोमासाईल सर्टिफिकेट)
३३)विद्यार्थ्याचे आई / वडील अथवा आई,वडील हयात नसल्यास आणि पालक असल्यास पालकांचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला (डोमासाईल सर्टिफिकेट)
३४)विद्यार्थ्यांची जात नमूद करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची प्रत (जात प्रमाणपत्र किंवा शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला)
३५)रुपये पाचशेच्या स्टॅम्पवर बंद पत्र ( निवडीनंतर सबमिट करावे लागेल )
३६)रुपये पाचशेच्या स्टॅम्पवर हमीपत्र ( निवडीनंतर सबमिट करावे लागेल )
३७)पॅन कार्ड
३८)संबंधित विद्यापीठाचे नाव असलेले THE आणि QS WORLD RANK 2023 लिस्ट.

◆ महत्वाचे
१) अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील फक्त एका विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
२) एक्झिक्यूटिव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झिक्युटिव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांकरता प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही.
३) या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनी घेतलेली नसावे तसेच त्याने अन्य प्रशासन विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

◆ शिष्यवृत्ती संबंधी GR डाउनलोड करण्याकरिता लिंक :-
https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/UploadedDOC/Foreign_Scholarship_Opencategory_GR_Final.pdf

◆ शिष्यवृत्ती माहिती पुस्तिका डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/UploadedOfficeDOC/Information%20Broucher.pdf

◆ शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे वेळापत्रक पाहण्याकरिता पुढील लिंकवर क्लिक :-
https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/UploadedOfficeDOC/Important%20Dates.pdf

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/

◆ To See Scholarship Advertisement Click on below link:-
https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/UploadedOfficeDOC/Foreign%20Scholarship%20Advt-2023-24.pdf

◆ हमीपत्र डाउनलोड करण्याकरिता लिंक :-
https://drive.google.com/file/d/1jjDwEVQ7JqTHOXl9A8n8Vew4MhVYGrsW/view?usp=sharing
◆ बंधपत्र डाउनलोड करण्याकरिता लिंक :-
https://drive.google.com/file/d/1Xu-dSsCiad1-Cp7LiOZmtMRhS6rF8eEH/view?usp=sharing
◆ आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/152I3Q1CaSu3LD8Ja9NbgcojMaIHFCWtq/view?usp=sharing

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- Directorate Of Technical Education ,Maharashtra State,
Mumbai 3, Mahapalika Marg, Post Box No.1967,
Opp. Metro Cinema, Mumbai – 400 001
ईमेल- desk17@dtemaharashtra.gov.in
वेबसाईट: https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/
मोबाईल- 8421331181, 022-68597419, 022-68597493
नागपूर
सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर जुने मोरिस कॉलेज इमारत, सीताबर्डी, नागपूर, पिन कोड: ४४०००१.
दूरध्वनी: ०७१२-२५६१७१३.
ई-मेल: dhangp@rediffmail.com

कोल्हापूर
सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर राजाराम महाविद्यालयात कॅम्पस, विद्यानगर, कोल्हापूर पिन कोड: ४१६००२.
दूरध्वनी: ०२३१-२५३५४५२.
ई-मेल: jddhokopscholarship@gmail.com

औरंगाबाद
सहसंचालक, उच्च शिक्षण, औरंगाबाद
पदम पुरा स्टेशन रोड, देवगिरी महाविद्यालयाजवळ, औरंगाबाद, पिन कोड: ४३१००१.
दूरध्वनी: ०२४०-२३३१९१३. ई-मेल: schol.jdheaur@gmail.com

अमरावती
सहसंचालक, उच्च शिक्षण, अमरावती
विदर्भ संस्था परिसर, अमरावती पिन कोड: ४४४०६४, अमरावती जिल्हा
दूरध्वनी: ०७२१-२५३१२३५.
ई-मेल: jdhaamt@yahoo.com.
मुंबई
सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई
मुंबई- 3 महानगरपालिका मार्ग, (एल्फिन्स्टन तांत्रिक हायस्कूल परिसर), धोबीतलाव, तळमजला. मुंबई
पिन कोड: ४००००१. दूरध्वनी: ०२२-२२६५६६००.
ई-मेल: jdhomumbai@gmail.com

पुणे
सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे, १७ डॉ. आंबेडकर रोड, सेंट मॅथ्यूज मराठी वर्ष शेजारी, लाल देऊळ समोर, कैम्प, पुणे : ४११००१. दूरध्वनी: ०२०-२६१२७८३३.
ई-मेल: jdhopune@gmail.com

जळगाव
सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पहिला मजला, ग्राहक न्यायालय, जळगाव. पिन कोड: ४२५००९.
दूरध्वनी: ०२५७-२२३८५१०. ई-मेल: jdhe_jal@yahoo.co.in

नांदेड
सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड यशवंत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर, नांदेड पिन कोड: ४३१६०५.दूरध्वनी: ०२४६२-२५३१४४.
ई-मेल: dhe.nanded@yahoo.co.in

पनवेल
सहसंचालक, उच्च शिक्षण, पनवेल
शासकीय अध्यापक महाविद्यालय (परिसर), मुंबई पुणे मार्ग, पनवेल पिन कोड: ४१०२०६. रायगड जिल्हा. दूरध्वनी: ०२२-२७५१४२०.
ई-मेल: dire. 1994@gmail.com

सोलापूर
सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर
डी उपविभाग अध्यक्ष उमजला प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सोलापूर, पिन
कोड: ४१३००१, सोलापूर जिल्हा.दूरध्वनी: ०२१७-२३५००५५.
ई-मेल: desai@rediffmail.com

मुंबई
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई
४९. खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१. दुरध्वनी ०२२-२६४७४८९२, २६४७१६१९.
ई-मेल : romumbai@dtemaharashtra.gov.in संकेतस्थळ: https://www.dteromumbai.org.in

पुणे
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे | ४१२ ब तिसरा मजला, तंत्रशिक्षण मंडळाची नवीन इमारत, ओम सुपर मार्केट जवळ, बहिरट पाटील चौक, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
दुरध्वनी ०२०-२५६५६२३४, २५६७८९७३, ई-मेल : ropune@dtemaharashtra.gov.in
संकेतस्थळ: https://www.ropune.org.in

नाशिक
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक न्यू पॉलिटेक्नीक एरिया, सामनगाव रोड, नाशिक- ४२२१०१. दूरध्वनी ०२५३-२४६१४७९.२४६०११४.
ई-मेल: ronasik@dtemaharashtra.gov.in संकेतस्थळ: https://www.dtensk.org

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद
स्टेशनरोड, उस्मानपूरा, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, औरंगाबाद-४३१००५. औरंगाबाद
दुरध्वनी ०२४०-२३३४२१६.२३३४७६९.
ई-मेल: roaurangabad@dtemaharashtra.gov.in)
संकेतस्थळ https://www.dleau.org

अमरावती
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती
कॉटन मार्केट रोड, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, अमरावती – ४४४६०३,
दूरध्वनी ०७२१-२५१३०२७.
ई-मेल: roamravati@dtemaharashtra.gov.in
संकेतस्थळ: https://www.jcroam.org

नागपूर
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर
शासकीय तंत्रनिकेतन परिसर, सदर बाजार, नागपूर ४४०००१
दूरध्वनी:- ०७१२-२५६५१४३.
ई-मेल : ronagpur@dtemaharashtra.gov.in
संकेतस्थळ: https://www.renagpur.org.in