फाउंडेशन फॉर अकॅडेमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:
FAEA शिष्यवृत्ती फाउंडेशन फॉर अकॅडेमिक एक्सलन्स & ऍक्सेस फाउंडेशनद्वारे दिली जाते. कला/वाणिज्य/विज्ञान/वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी एकूण 50 विद्यार्थ्यांना FAEA फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळेल.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / लाभ:-
पूर्ण ट्यूशन फी.
देखभाल भत्ता
वसतिगृह/मेस शुल्क
कपडे, पुस्तके खरेदी आणि प्रवास भत्ता.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
1) ऑनलाइन अर्ज
2) मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणी

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० जून २०२३

◆ पात्र अभ्यासक्रम:-
कला/वाणिज्य/विज्ञान/वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांमधील कोणताही अंडरग्रेजुएट कोर्स.
वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ पात्रता निकष:-
1) भारतातील मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 2022-2023 या शैक्षणिक वर्षात 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत.
2) केवळ पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले किंवा प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
3) केवळ सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील विद्यार्थी फाउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स अँड एक्सेस (FAEA) शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.faeaindia.org/Registration2023/ImportantInstruction.aspx
https://www.faeaindia.org/

◆ माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: –
https://www.faeaindia.org/ADV2023.pdf

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.faeaindia.org/Registration2023/Default.aspx
https://www.faeaindia.org/Registration2023/Registration.aspx

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- फॉउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA)
C-25, कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया
न्यू मेहरौली रोड
नवी दिल्ली – 110 016.
फोन: +९१ ११ ४१६८ ९१३३
ईमेल- inquiry@faeaindia.org