◆ शिष्यवृत्ती बद्दल
डिलिव्हरी पार्टनरच्या मुलींना आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी फीडिंग इंडियाकडून डिलिव्हरी पार्टनरच्या मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. या शैक्षणिक वर्षात ज्या डिलिव्हरी पार्टनरच्या मुली पहिली ते बारावीपर्यंत कोणत्याही इयत्तेत शिकत आहेत त्यांना 24,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती फीडिंग इंडियाकडून दिली जाईल .
◆ टीप: ही शिष्यवृत्ती फक्त डिलिव्हरी पार्टनरच्या मुलींना दिली जाते.
◆ शिष्यवृत्तीचे फायदे / रक्कम :-
इयत्ता पहिली ते दहावी : रु. 24,000 पर्यंत शिष्यवृत्ती
इयत्ता अकरावी & बारावी :रु. 24,000 पर्यंत शिष्यवृत्ती
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
१२ जुलै २०२३ ( इयत्ता पहिली ते दहावी )
१३ जुलै २०२३ (इयत्ता अकरावी & बारावी )
◆ पात्रता निकष:
१) ही शिष्यवृत्ती डिलिव्हरी पार्टनर्सच्या मुलींना दिली जाते, ज्या डिलिव्हरी पार्टनर्सनी आजपर्यंत विविध प्लॅटफॉर्मवर अन्न आणि किराणा डिलिव्हरीसाठी ५०००ऑर्डर पूर्ण केल्या आणि जानेवारी २०२२ते डिसेंबर २०२३ पर्यंत ८०० ऑर्डर पूर्ण केलेल्या आहेत .
2) डिलिव्हरी पार्टनरची फक्त मुलगीच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
.
◆ टीप:- शिष्यवृत्ती निवडीसाठी मुंबई, दिल्ली एनसीआर आणि बंगलोर येथील डिलिव्हरी पार्टनर्सच्या मुलींना प्राधान्य दिले जाईल.
◆ आवश्यक कागदपत्रे:
- मागील इयत्तेचे मार्कशीट
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड / विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे बँक खाते पासबुक / रद्द केलेला चेक
- शाळेचे बँक खाते तपशील
- विद्यार्थी संबंधित शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असल्याचे शाळेकडून शिक्का मारलेले आणि स्वाक्षरी केलेले पत्र
- शाळेची फी भरलेली फी पावती
- विद्यार्थ्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र
◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक:
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/registration
◆ फीडिंग इंडिया शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी:-
पहिली ते दहावी वर्गासाठी https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/376/938_8.html
इयत्ता 11वी आणि 12वी साठी https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/376/935_5.html
◆ संपर्क तपशील:
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३
फोन- ०२२-४०९०४४८४ / ८६५२१३६४२२
संपर्क व्यक्ती- राजेश मिश्रा
ईमेल- RajeshM@proteantech.in, vidyasaarathi@proteantech.in
वेबसाइट- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/