एकलव्य ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम

Eklavya Global Scholar

◆ एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामबदद्ल :-
एकलव्य इंडिया फाऊंडेशन गेल्या सहा वर्षांपासून पहिल्या पिढीतील आणि उपेक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून, त्यांना भारत आणि परदेशातील प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि विकासाशी संबंधित फेलोशिपमध्ये प्रवेश मिळवून देण्यात मदत करत आहे. सुरवातीला भारतात दर्जेदार शिक्षण मिळावे, यावर भर देत एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामच्या (जीएसपी) माध्यमातून या वर्षीपासून जागतिक स्तरावर उदयोन्मुख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एकलव्य इंडिया फाऊंडेशनने एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामचा विस्तार केला आहे. गेल्यावर्षी प्रायोगिक टप्प्यात ६० पैकी ४० विद्यार्थ्यांना अव्वल दर्जाच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असून, अनेकांना पूर्ण अनुदानित शिष्यवृत्तीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या वर्षी, हा कार्यक्रमाकरिता STEM(Science, Technology, Engineering and Medical) या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातील विद्यापीठांत विद्यार्थ्यांना प्रवेश त्याचबरोबर फेलोशिप आणि शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे उद्दीष्ट आहे.

◆ एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामची वैशिष्ट्ये:-

  1. Residential Bootcamps/ workshops
  2. Dedicated mentorship
  3. All-Rounded Support
  4. Community and Peer Support
  5. Global network of 100+ international Mentors

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 20 जून 2023

◆ पात्रता निकष :-
1 हा कार्यक्रम केवळ परदेशात केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

◆ निवड प्रक्रिया :-

  1. निवड प्रामुख्याने अर्जावर आधारित असेल.
  2. ग्रामीण, आदिवासी आणि बिगर इंग्रजी माध्यमाची पार्श्वभूमी असलेल्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना प्राथमिकता.
  3. एकूण 100 स्लॉट
  4. STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय) आणि सामाजिक विज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जागांचे पुरेसे विभाजन (50-50).

◆ एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामबदद्ल अधिक माहितीसाठी लिंक :-
https://linktr.ee/Eklavyagsp

◆ अर्ज करण्याकरिता लिंक:-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehH2–YE5JitA1Jj2RoGOVMrrjRMpV_jJUdNmzOy_ZO2pWkA/viewform

◆ संपर्क तपशील:-
ई मेल: eklavyagsp@gmail.com