शिक्षा – RBL Bank शिष्यवृत्ती 2026-27

शिष्यवृत्तीबद्दल
शिक्षा – RBL Bank स्कॉलरशिप 2026-27 ही अंडरग्रॅज्युएट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
या स्कॉलरशिपच्या माध्यमातून RBL Bank विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत करते.
कोणत्याही विषयातील अंडरग्रॅज्युएट कोर्स करणारे विद्यार्थी, जर त्यांनी स्कॉलरशिपच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केल्या असतील, तर यासाठी शिष्यवृत्ती करिता अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्तीचा फायदा :
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹20,000 पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
ही रक्कम विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही खर्च भागवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2026

अर्ज प्रक्रिया 27 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.

शिष्यवृत्ती करिता पात्रता निकष :

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

⦁ विद्यार्थ्याला 10वीमध्ये किमान 60% गुण मिळालेले असावेत.
⦁ विद्यार्थ्याला 12वीमध्ये किमान 60% गुण मिळालेले असावेत.
⦁ विद्यार्थी सध्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असावा.
⦁ विद्यार्थी 3 वर्षांच्या Full-Time Undergraduate Course मध्ये शिकत असावा.
⦁ विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹4 लाखांपेक्षा कमी असावे.
⦁ कोणत्याही विषयातील पदवी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात, जर त्यांनी वरील सर्व अटी पूर्ण केल्या असतील.

कोणते कागदपत्रे लागतील? :

  • पासपोर्ट साइज फोटो
  • आयडेंटिटी प्रूफ – PAN Card, Voter ID, Driving Licence किंवा Passport
  • ॲड्रेस प्रूफ – Voter ID, Driving Licence, Bank Passbook किंवा Passport
  • Bank Passbook चे पहिले पेज किंवा मागील 1 महिन्याचे Bank Statement
  • 10वी आणि 12वीची सर्टिफिकेट्स
  • Semester 1 ची मार्कशीट, उपलब्ध असल्यास
  • चालू वर्षाचे Income Certificate
  • कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटने साइन आणि स्टॅम्प केलेले Bonafide Certificate
  • कॉलेजची फी भरली असल्यास Tuition Fee Receipt
  • कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटची Fee Structure

महत्त्वाचे:
अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट्स स्पष्ट दिसणारे असावेत आणि ते JPEG किंवा PNG फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे.

या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या नावावर Student Bank Account असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

पात्र विद्यार्थी Vidyasaarathi पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी:
⦁ तुम्ही सर्व पात्रता अटी पूर्ण करता का ते तपासा.
⦁ सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
⦁ अर्जामध्ये तुमची माहिती योग्य पद्धतीने भरा.
⦁ Documents स्पष्ट आणि योग्य format मध्ये upload करा.

शिष्यवृत्ती करिता विद्यार्थ्यांची निवड कशी होईल?

अर्ज करताना विद्यार्थ्यांनी योग्य माहिती आणि आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे आहे.

दिलेल्या अटींनुसार पात्र विद्यार्थ्यांमधून शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
गरज पडल्यास विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे तपासणीसाठी दाखवावी लागू शकतात.
तसेच, त्याच कारणासाठी दुसरी शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांना द्यावी लागेल.

शिष्यवृत्ती विषयी अधिक माहितीसाठी लिंक –

https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/503/1710_9.html

शिष्यवृत्ती अर्ज करण्याकरिता लिंक –

https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/registration/1710/RBL-Bank-Limited

संपर्कासाठी :
योजनेबाबत प्रश्न असल्यास:
📧 vidyasaarathi@proteantech.in