◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
एलआयसी गोल्डन जुबिली शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिली जाते. LIC गोल्डन ज्युबली शिष्यवृत्ती भारतातील सरकारी किंवा खाजगी महाविद्यालय/विद्यापीठातील शिक्षण घेण्यासाठी दिली जाते. यामध्ये नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) शी संलग्न औद्योगिक प्रशिक्षण संस्था/औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बारावी इयत्तेनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम देखील समाविष्ट आहेत.
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १४ जानेवारी २०२४
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:
जनरल शिष्यवृत्ती –
वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रु.40,000/- वार्षिक.
अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रु.३०,०००/-.
सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये/संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) मधून कोणत्याही शाखेतील पदवी,इंटिग्रेटेड कोर्सेस, कोणत्याही क्षेत्रातील डिप्लोमा अभ्यासक्रम किंवा इतर समतुल्य अभ्यासक्रम यांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 20,000 रुपये.
विशेष मुलींसाठी शिष्यवृत्ती-
इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना इयत्ता अकरावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा एनसीवीटी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेण्यासाठी रु. 15,000/- प्रतिवर्ष
◆ LIC गोल्डन जुबिली शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रम : –
1) वैद्यकीय
२) अभियांत्रिकी
३) कोणताही पदवी अभ्यासक्रम
4) डिप्लोमा
5) ITI
6) व्यवसाय अभ्यासक्रम
7) इयत्ता अकरावी (फक्त 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलींसाठी)
8) कला, विज्ञान, वाणिज्य या विषयातील पदवी अभ्यासक्रम
9) व्यावसायिक अभ्यासक्रम
◆ पात्रता:
- 2022-2023 या शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले विद्यार्थीच LIC गोल्डन ज्युबली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
- ज्या विद्यार्थ्यानी डिप्लोमा नंतर थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतील किंवा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात नियमित प्रवेश घेतला आहे ते एलआयसी गोल्डन ज्युबली शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
● सामान्य शिष्यवृत्ती
अ) जे विद्यार्थी 2022-23 या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा (किंवा त्याच्या समतुल्य – नियमित/व्यावसायिक) / डिप्लोमा किमान 60% गुणांसह (किंवा समतुल्य श्रेणी) उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांचे पालक/पालक यांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक रु.2,50,000 पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
b) सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये/संस्था , विद्यापीठ किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) मधून ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय, अभियांत्रिकी, कोणत्याही शाखेतील पदवी, इंटिग्रेेड अभ्यासक्रम, कोणत्याही क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम किंवा इतर समतुल्य अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम, आयटीआय या क्षेत्रात शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना LIC सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती दिली जाते.
c) ज्या विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आहे आणि त्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि आयटीआय , व्होकेशनल कोर्सेस , व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा करिता प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी एलआयसी गोल्डन जुबली शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत
● मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती
अ) ज्या मुलींनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात 10 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केली आहे आणि सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये/संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील अभ्यासक्रमांद्वारे इंटरमिजिएट/अकरावी/व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
◆ शिष्यवृत्तीचा कालावधी :- अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण होईल.
◆ कौटुंबिक उत्पन्न मर्यादा:- वार्षिक 2,50,000 रुपये
(जर कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती स्त्री असेल (विधवा/एकटी आई/अविवाहित) – कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु.4 लाख प्रतिवर्ष)
◆ शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत :- ऑनलाइन
◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक:- https://gjss.licindia.in/GJSS/
◆ आवश्यक कागदपत्रे: – (वेबसाइटवर अपलोड करायचे नसले तरीही फॉर्म भरताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे)
1 आधार कार्ड
2 इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, डिप्लोमा मार्कशीट( जे उपलब्ध असतील ते )
3 बँक पासबुक
4 कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील
◆ टीप:-
- एलआयसी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आधारावर केली जाईल जसे की इयत्ता 12 वी / 10 वी / डिप्लोमामधील गुणांची टक्केवारी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न.
- उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेवर केली जाईल. निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या यादीवर आधारित गुणांच्या उतरत्या क्रमाने केली जाईल. गुणांच्या टक्केवारीत बरोबरी झाल्यास, ज्यांच्या पालकांचे उत्पन्न सर्वात कमी आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाईल.
- जे विद्यार्थी Distance Learning किंवा Part टाईम शिक्षण घेत असतील तर असे उमेदवार शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतील.
- कुटुंबातील एकच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो. तथापि, एकाच कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाऊ शकतो जर दुसरा उमेदवार मुलगी असेल.
- चार्टर्ड अकाउंटंट (C.A) /CS/ICWA किंवा तत्सम अभ्यासक्रम करत असलेले उमेदवार देखील शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
- मुलींसाठी विशेष शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या उमेदवारांनी शिष्यवृत्ती नूतनीकरनासाठी पात्र होण्यासाठी 11वीमध्ये 50% गुण मिळवले पाहिजेत.