अ‍ॅमेझॉन फ्युचर इंजिनिअर – फाउंडेशन फॉर एक्सलन्स शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीबद्दल:

अ‍ॅमेझॉन फ्युचर इंजिनिअर – फाउंडेशन फॉर एक्सलन्स शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना अभियांत्रिकी, संगणकशास्त्र व संबंधित व्यावसायिक शिक्षणासाठी मदत करणे.

AFE India Scholars ना आर्थिक मदतीशिवाय, अ‍ॅमेझॉनतर्फे लॅपटॉप, मार्गदर्शन, कौशल्यविकास, नेटवर्किंग संधी आणि अ‍ॅमेझॉन इंटर्नशिपसाठी पात्र होण्याची संधी दिली जाते.

AFE Scholars ना अ‍ॅमेझॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी fireside chats, तंत्रज्ञान टीमसोबत संवाद, आणि skills-building hackathon च्या माध्यमातून प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव मिळतो.या शिष्यवृत्तीमुळे एका पिढीत तुमचे व्यावसायिक जीवन यशस्वी होऊ शकते आणि तुमचे कुटुंब दारिद्र्यातून बाहेर पडू शकते.

ही शिष्यवृत्ती कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाच्या मर्यादेशिवाय दिली जाते. या शिष्यवृत्तीकरिता पात्रतेचा एकमेव निकष म्हणजे – शैक्षणिक गुणवत्ता, कौटुंबिक उत्पन्न, आणि तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा!

शिष्यवृत्तीचे लाभ / रक्कम:

दरवर्षी ₹50,000 (प्रत्येक वर्षासाठी पन्नास हजार रुपये) शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉनकडून खालील गोष्टीही दिल्या जातील –

* लॅपटॉप

* मार्गदर्शन (Mentorship)

* कौशल्यविकासाच्या संधी (Skill Building Opportunities)

* नेटवर्किंग संधी

* Amazon Internship साठी संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025

पात्रता निकष:

1) B.E. / B.Tech / Integrated M.Tech या अभ्यासक्रमांचा प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत.

2) ज्या विद्यार्थिनींनी 2023 नंतर 12वी / Pre-University / CBSE / ISC किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे फक्त अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास पात्र आहेत.

3) सध्या शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश राज्य/राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेच्या मेरिट रँक किंवा राज्यस्तरीय कौन्सेलिंग प्रक्रियेद्वारे घेतला असलेल्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत

4) ज्या विद्यार्थिनींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹3,00,000 पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींनाच शिष्यवृत्ती मिळेल.

शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र असणाऱ्या अभियांत्रिकी शाखा:

(शिष्यवृत्ती करिता सर्व शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे अर्ज स्वीकारले जातील, पण खालील शाखांना प्राधान्य दिले जाईल)

* Computer Science And Engineering

* Information And Communication Technology

* Information Science

* Information Science And Engineering

* Information Technology

Note:

* डिप्लोमा पूर्ण करून थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेल्या मुलींना ही शिष्यवृत्ती मिळणार नाही.

* Gross Income म्हणजे कर किंवा इतर कपातींपूर्वीचे एकूण कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल.

* या शिष्यवृत्ती करिता फक्त उत्पन्नच नाही, तर पालकांचे शिक्षण व व्यवसाय, भावंडांची स्थिती, राहणीमान आणि शिक्षणावर होणारा खर्च पाहून आर्थिक पात्रता ठरवली जाईल.

* ज्या मुली त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पदवीधर (Graduate) असतील, त्यांना प्राधान्य दिले जाईल

अधिक माहितीसाठी लिंक:

https://ffe.org/amazon-future-engineer/

https://www.amazonfutureengineer.in/Scholarship%20and%20Internship-%202025

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक:

https://ffe.org/amazon-future-engineer/#apply

संपर्क माहिती:

पत्ता: Foundation For Excellence, No. 840, 5th Main, Indiranagar 1st Stage, Bengaluru 560038, India

फोन: +91 (080) 2520 1925

ई-मेल: scholarships@ffe.org

afe-inquiry@ffe.org

वेबसाइट: https://ffe.org