◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी -मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातील सिलेक्टड २०० कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाते. कोणत्या कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल त्या कॉलेजची लिस्ट पुढील लिंकवर उपलब्ध आहे. ( https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/List%20of%20Instituets%20Colleges%20applicable%20for%20Dr.%20Punjabrao%20Deshmukh%20Merit%20Scholarship.pdf
देशांतर्गत उच्च शिक्षणाकरिता
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
- विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क नोंदणी फी जिमखाना ग्रंथालय संगणक इत्यादी शुल्क विद्यार्थ्यांना दिले जाईल.
- अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने किंवा विद्यापीठांनी आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची सत्रनिहाय रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाईल.
- जे विद्यार्थी शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठाच्या होस्टेल मध्ये न राहता दुसऱ्या ठिकाणी राहत असतील तर अशा विद्यार्थ्यांना वस्तीगृह शुल्क आणि भोजन शुल्क जे विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांचे असते तितके दिले जाईल.
- शिष्यवृत्ती करता सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी वार्षिक २५००० रुपये दिले जातील, त्याचबरोबर इतर शैक्षणिक खर्चासाठी २५००० रुपये दिले जातील.
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :– ३० ऑक्टोबर २०२३
◆ कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठवण्याची अंतिम तारीख :- १५ नोव्हेंबर २०२३
◆ पात्र अभ्यासक्रम:-
१ कोणताही पदवी अभ्यासक्रम
२ कोणताही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
३ कोणताही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ( पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा )
◆ पात्रता निकष:-
1) जर विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 55% गुण मिळवणे आवश्यक आहे.
2) पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा च्या परीक्षेमध्ये किमान 55 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
3) पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएशन) अभ्यासक्रमाच्या शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेमध्ये किमान 55 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
4) शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्याकरिता महाराष्ट्र राज्य विभागीय विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
5) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकुण वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
6) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातीमधील विद्यार्थ्यांना फक्त ही शिष्यवृत्ती दिली जाईल.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
i) महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र,
(ii) विदयार्थी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा जातीचा असल्याचा पुरावा /जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला)
(iii) फॉर्म नं.१६ OR उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला) OR आयकर विवरण पत्र (IT RETURN )
(iv) ‘इयत्ता १२ वीचा शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला,
(v) संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र,
(vi) आधार कार्ड, पॅन कार्ड (पालकाचे) व आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल.
(vii) संपुर्ण गुणपत्रिका, इ.१२वी / डिप्लोमा / पदवी इत्यादी परिक्षांच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका
◆ शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धती
१ ऑनलाईन अर्ज करणे
( LINK ;- https://admin.sarthi-maharashtragov.in/auth/login )
२ शिष्यवृत्ती फॉर्म डाउनलोड करणे तो फॉर्म व्यवस्थित फील करणे आणि त्याबरोबर या शिष्यवृत्तीकरता आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून तो फॉर्म १५ नोव्हेंबर २०२३ अगोदर पर्यंत सारथी संस्थेच्या पत्त्यावर पाठवणे.
३ या शिष्यवृत्ती करता ऑनलाइन अर्ज भरणे त्याचबरोबर ऑफलाइन फॉर्म भरून तो आवश्यक कागदपत्रांसोबत सारथी संस्थेच्या पत्त्यावरती पाठवणे आवश्यक आहे.
◆ NOTE:-
- पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.
- दरवर्षी ३०० विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्ती करिता करण्यात येईल. ( वार्षिक तीन लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना तर तीन ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पाच लाख ते आठ लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.)
- विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या/केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या/केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
- जर विद्यार्थ्याचे मार्कशीट सीजीपीए किंवा जीपीएच्या ( पॉईंटर ) स्वरूपात असतील तर संबंधित विद्यापीठाचे सीजीपीए किंवा जीपीएचे टक्केवारीत रूपांतर करण्याचे प्रमाणपत्र अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती मध्ये पन्नास टक्के जागा विद्यार्थिनींसाठी राखीव असणार आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांनी सारथी संस्थेने सिलेक्ट केलेल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांसाठी त्या कॉलेज किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश घेतला आहे असेच विद्यार्थी फक्त या शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत, याचाच अर्थ मॅनेजमेंट कोट्यामधून प्रवेश घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ किंवा संस्थांमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे फक्त असेच विद्यार्थी विद्यार्थिनी या शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत. डिस्टन्स लर्निंग करणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरता पात्र नाहीत.
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://sarthi-maharashtragov.in/
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://admin.sarthi-maharashtragov.in/auth/login
◆ LINKS :-
DOWNLOAD ADVERTISEMENT – https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A5%A8%E0%A5%AA%20(2).pdf
DOWNLOAD APPLICATION FORM –
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/%E2%80%9C%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4%20%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%20-2023%E2%80%9D%20-%20Application%20Form.pdf
DOWNLOAD TERMS & CONDITION –
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/Terms%20&%20Conditions%20updated%20-deshatargat%20scholarship.pdf
DOWNLOAD ELIGIBLE COLLEGE LIST –
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/List%20of%20Instituets%20Colleges%20applicable%20for%20Dr.%20Punjabrao%20Deshmukh%20Merit%20Scholarship.pdf
To Download हमीपत्र
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA.docx.pdf
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411 004.
ईमेल- sarthiskvdept@gmail.com
संपर्क क्रमांक – 020-25592502