◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
हि शिष्यवृत्ती श्री बृहद भारतीय समाजाकडून सुरू करण्यात आली आहे. श्री बृहद भारतीय समाज शिष्यवृत्ती सध्या कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. श्री बृहद भारतीय समाजकडून गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. श्री बृहद् भारतीय समाजाकडून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात , वैद्यकीय (एम.बी.बी.एस., आयुर्वेद आणि होमिओपथी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, संगणक शास्त्र, कृषी पशुरोगचिकित्सा शाख नर्सिंग, शिक्षण शास्त्र या अभ्यासक्रमांत भारतीय विद्यापीठ किंवा महाविद्यालयात पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:– शिक्षणाकरिता आर्थिक मदत
◆ शेवटची तारीख:-
कार्यालयामधून शिष्यवृत्ती अर्ज घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३
पूर्ण भरलेले शिष्यवृत्ती अर्ज परत करण्याची अंतिम तारीख ०४ सप्टेंबर २०२३
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर:
पदवी अभ्यासक्रम- Undergraduation
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- Post Graduation
अभ्यासक्रमाचे नाव:
वैद्यकीय – (एम.बी.बी.एस., आयुर्वेद आणि होमिओपथी) कोणताही वैद्यकीय अभ्यासक्रम
अभियांत्रिकी- कोणताही इंजिनिअरिंग अभ्यासक्रम
तंत्रज्ञान,
फार्मसी,
संगणक शास्त्र,
कृषी
पशुरोगचिकित्सा
नर्सिंग
शिक्षण शास्त्र
◆ पात्रता निकष:-
१) वरती पात्र अभ्यासक्रम सेक्शन मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही कोर्समध्ये पदवी (Undergraduation ) किंवा पदव्युत्तर पदवी ( Post Graduation ) अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला असेल तर मागील इयत्तेत किमान ७०% गुण मिळवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चतूर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षात किमान ६०% गुण मिळवणे आवश्यक आहे.
३) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. १,५०,००० किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. परंतु यापेक्षा जास्त उत्पन्न असणारे विद्यार्थीसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
४) नर्सिंग शिक्षणाकरिता प्रथम वर्ष व त्यावरील वर्षात शिकणाऱ्या किमान ४५% गुण असणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ अर्ज करण्याची पद्धत:-
ऑफलाईन
या शिष्यवृत्तीचे अर्ज, प्रपत्रे आणि नियमांच्या प्रती एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, १७८, बँकवे रिक्लमेशन, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, एल. आय. सी. योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई ४०००२० येथील समाजाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत आणि हा अर्ज मोठ्या आकाराचा स्वतःचा पत्ता लिहिलेला (रु. २०/- ची तिकिटे लावलेला) लिफाफा समाजाकडे पाठवून सुध्दा मिळविता येईल. किंवा स्वतः श्री बृहद भारतीय समाजाच्या वरती नमूद केलेल्या पत्त्यावर भेट देऊन अर्ज मिळवू शकता.
( अर्ज मिळवण्याकरिता आपण पोस्ट किंवा कुरिअर द्वारे दोन लिफाफे पाठवायचे आहेत ( एकामध्ये एक टाकून ). समाज आपण जो लिफाफा पाठवाल त्यामध्ये अर्ज पाठवून देईल. आपण पाठवणाऱ्या लिफाफ्यावर २० रुपयांचे पोस्टाचे तिकीट लावणे आणि स्वतःचा पत्ता लिहिणे आवश्यक आहे. )
◆ टीप:-
• शिष्यवृत्ती देण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
• केंद्र सरकार / अथवा राज्य सरकारकडील किंवा त्यांचे विद्यापीठ महाविद्यालय / संस्था यांच्याकडील शिष्यवृत्ती मिळत असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
• ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. १,५०,००० किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरीता प्राधान्य देण्यात येईल.
•
◆ संपर्क तपशील:-
पत्ता-
श्री बृहद भारतीय समाज शिष्यवृत्ती
एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, १७८, बँकवे रिक्लमेशन, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, एल. आय. सी. योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई ४०००२०
संपर्क व्यक्ती- एस. व्ही. फेणे
फोन – ०२२२२०२०११३