◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ५०,०००/- कमाल
◆ शिष्यवृत्ती कोणासाठी:-
१) बाल वर्ग ते इयत्ता १२ वी तथा समकक्ष वर्गामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी:- २०,०००/
२) दिव्यांग मुले व व्यक्तींना शिक्षण व थेरपीकरीता अर्थसहाय्य २४,०००/ रु.२५०/- प्रति सत्र (प्रति महा कमाल रु.२०००/- मात्र )
३) पदवी तथा समकक्ष विभागामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी:- २५,०००/
४) पदव्युत्तर पदवी तथा समकक्ष विभागामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी:- ३०,०००/-
५) उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी (पीएचडी, एमफील तथा समकक्ष विभागामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांगा विद्यार्थी):- ४०,०००/-
६) व्यवसाय / लघुउद्योग/ तांत्रिक/ अभियांत्रिकी / वैद्यकीय शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाची फी:- ५०,०००/- कमाल
७) राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिडा क्षेत्रामध्ये भाग घेणारे खालील दिव्यांग विद्यार्थी तथा व्यक्ती:- ५०,०००/- कमाल
अ) शासकीय तथा शासनमान्य शाळा, महाविद्यालय व संस्थामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी तथा व्यक्ती
ब) नोकरी तथा व्यवसाय करणारे दिव्यांग व्यक्ती
८) केंद्र शासनाचा लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी. पुर्वतयारीकरीता स्पर्धा परीक्षा केंद्र मध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्याथ्याच्या शुल्काची रक्कम
◆ पात्रता निकष:-
१. सदर योजनेतर्गत अर्जदार शासकीय अथवा शासनमान्य असलेल्या संस्थेत शिक्षण तथा प्रशिक्षण घेत असलेला पाहिले किंवा RCIMCI महाराष्ट्र कौन्सिल फॉर OT/PT मार्फत नोंदणीकृत तज्ञ व्यक्तीकडे प्रशिक्षण घेत असलेला पाहिजे.
२. बौध्दिक दृष्टया अक्षम असणारी दिव्यांग मुले अथवा व्याक्ती त्यांचे पालक अथवा कायद्यानुसार पालकत्व धारण केलेली व्यक्ती अर्ज सादर करतील..
३. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर परंतू संपूर्ण अर्ज व कागदपत्राची पूर्तता केल्यास त्या पात्र अर्जदारास लाभ देण्यात येईल.
४. एखाद्या पात्र अर्जदारासंबधित खोटे कागदपत्र जोडण्यात आले असे निदर्शनास आल्यास पात्र अर्ज अपात्र करण्याचे किंवा लाभार्थ्यावर कारवाई करण्याचे सर्व अधिकार मा. आयुक्त, नामनपा यांना राहतील. टिप :- डोनेशन रक्कम या योजने अंतर्गत अदा करता येणार नाही.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
१. नाशिक महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्य करीत असले बाबत पाणी बील, वीजबील, मालमत्ता कर पावती, वास्तव्याचा करारनामा, रेशनकार्ड यापैकी कोणतेही दोन पुरावे सादर करावे.
२. आधार कार्ड तथा पावतीची छायांकित प्रत सादर करणे.
३. जन्माचा दाखला आथवा वयाचा पुरावा छायांकित प्रत सादर करणे.
४. अपंगत्वाचे प्रमाणपत्र छायांकित प्रत सादर करणे.
५. फी भरल्याची पावतीची छायाकिंत प्रत सादर करणे
६. पॅनकार्ड व बँकेच्या पास बुकची छायांकित प्रत सादर करणे.
७. तक्त्यामधील मुद्या क्र.२ च्या अर्थ सहाय्यकरीता लाभार्थ्याने नोंदणीकृत असलेल्या तज्ञ (Rehab Professional) व्यक्तीकडून प्रशिक्षण घेत असलेले प्रमाण पत्र त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या प्रमाणपत्रासहीत सादर करणे.
८. तसेच शिक्षण व प्रशिक्षण घेत असल्या बाबतचे बोनाफाईड सर्टीफीकेट किंवा तज्ञ मार्गदर्शकाचे त्यांच्या लेटरहेडवर प्रमाणित करुन प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
९. ० ते ५ वयोगटातील दिव्यांग मुलाकडे दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यास खाली नमुद केलेल्या संस्थेमधील तज्ञ व्यक्तीमार्फत देण्यात आलेले प्रमाणपत्र / अहवाल ग्राहय धरण्यात येईल.
● राष्ट्रीय विकलांग संस्था, बांद्रा (कर्णबधिर)
● राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था, ( मतिमंद, सेलेब्रल पाल्सी, गतिमंद, स्वमग्न)
● संदर्भ रुग्णालय, नाशिक, अथवा सिव्हील हॉस्पिटल, नाशिक (अंध)
● नाशिक महानगरपालिका, वैद्यकिय (आरोग्य) अधिकारी, नाशिक )
१०. सदर आर्थिक वर्षामधील योजनेचा लाभ मिळवणेकरीता अर्जदारास इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय तसेच नामनपा मार्फत राबविण्यात येणा-या अपंग योजनेचा लाभ घेतला नाही किंवा घेणार नाही यास्वरूपाचे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
◆ संपर्क:-
१) पत्ता:- नाशिक महानगरपालिका, नाशिक
समाज कल्याण विभाग
तळ मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक-४२२००२.
२) वेबसाईट: www.nmc.gov.in
३) दुरध्वनी क्रमांक ०२५३-२२२२४५२
४) इमेल:- dme_sw@nmc.gov.in
◆ अर्जाची लिंक:- (अर्जाचा फॉर्म डाउनलोड करून तो हस्ताक्षरात भरून पाठवणे)
https://drive.google.com/file/d/1Uu77vRmRxKL7HPvhcBpS9WplfwjQO1bV/view?usp=drivesdk