◆ फेलोशिप रक्कम:-
१) वर्ग अ मध्ये दरमहा रु. ५०० एक वर्षाच्या कालावधीसाठी
२) वर्ग ब मध्ये दरमहा रु. १००० एक वर्षाच्या कालावधीसाठी
३) वर्ग क मध्ये दरमहा रु. १००० एक वर्षाच्या कालावधीसाठी
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – १९ मार्च २०२१
◆ निकालाची तारीख: – १५ एप्रिल २०२१
◆ फेलोशिप बद्दल:-
“वेस्ट टू वेल्थ” मिशन अंतर्गत भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने कचरा व्यवस्थापनाच्या शास्त्रशुद्ध आणि शाश्वत कार्यात हातभार लावणाऱ्या विद्यार्थी, समाजसेवक / बचतगट आणि महानगरपालिका / स्वच्छता कामगारांना “स्वच्छ सारथी फेलोशिप” पुरस्कारा देण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
कचरा व्यवस्थापन / जागरूकता मोहीम / कचरा सर्वेक्षण इत्यादी सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या तसेच आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी होणारा कचरा कमी करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सदर फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
◆ पात्रता निकष:-
१) कचरा व्यवस्थापन कामात गुंतलेले ९वी ते १२वी इयतेचे शालेय विद्यार्थी श्रेणी-अ अंतर्गत येतील.
2) कचरा व्यवस्थापन कामात गुंतलेले महाविद्यालयीन/ कनिष्ठ महाविद्यालयीन/ युजी, पीजी, आणि संशोधन करणारे विद्यार्थी श्रेणी-ब अंतर्गत येतील.
3) संस्थेसोबत कार्य करणारे, स्वयं मदत संघटना (SHग), महापालिका, स्वच्छता कर्मचारी आपल्या नोकरिव्यतिरिक्त कचरा व्यवस्थापनाच्या कार्यात आपले योगदान देणारे श्रेणी-क अंतर्गत येतील.
◆ निवड निकष: –
१) अर्जदारांनी केलेल्या कामाची प्रासंगिकता
२) त्यांच्या कार्यात राबविलेले नाविन्यपूर्ण उपाय
३) हाती घेतलेल्या उपक्रमांच्या प्रतिकृतीची व्यावहारिकता
४) समवयस्क / समुदायांचा सहभाग.
५) वर्षभरासाठी प्रस्तावित कृती योजना
६) अपेक्षित निकाल आणि परिणाम
◆ पुरस्कार:-
१) अ वर्गातील स्वच्छता सारथींना दरमहा रु. ५००/- एक वर्षाच्या कालावधीसाठी.
२) ब वर्गातील स्वच्छता सारथींना दरमहा रु. १०००/- एक वर्षाच्या कालावधीसाठी.
३) क वर्गातील स्वच्छता सारथींना दरमहा रु. १०००/- एक वर्षाच्या कालावधीसाठी.
४) प्रत्येक वर्गातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यास त्या महिन्याचा स्वच्छता सारथी म्हणून घोषित केले जाईल
५) वर्षाच्या अखेरीस १० सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण प्रकल्प / पुढाकार / डेमो मॉडेल / अहवाल कार्यक्रमांतर्गत ‘मान्यता प्राप्त’ केले जातील.
◆ संपर्क:-
इमेल:- sbub@investindia.org.in
वेबसाईट:- https://www.psa.gov.in/mission/waste-wealth/38
◆ अर्ज करण्यासाठी दुवा: –
https://www.wastetowealth.gov.in/fellowship-form