◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹ १०,००० (दहा हजार रुपये)
◆ अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:- १५ मार्च २०२१
◆ शिष्यवृत्ती विषयी:-
मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१६पासून मराठी विज्ञान परिषदेने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. एम.एससी. भौतिकशास्त्र / गणित किंवा संख्याशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री) किंवा एम.ए. (गणित / संख्याशास्त्र) ह्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. एम.एससी. / एम.ए. (गणित / संख्याशास्त्र) या अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहेत. पात्रता निकष आणि अर्ज येथे पुढे उपलब्ध आहे. संकेतस्थळावर असलेला अर्ज योग्य रितीने भरल्यावर त्यावर विद्यापीठाचा शिक्का आणि सही घेऊन निकालांच्या प्रतींसह १५/०३/२०२१ पर्यंत परिषदेकडे पाठविणे अनिवार्य आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर निवड प्रक्रिया सुरू होईल आणि निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.
या शिष्यवृत्ती योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे-
- ही शिष्यवृत्ती योजना फक्त महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- एम.एससी. {भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री) / गणित किंवा संख्याशास्त्र} अथवा एम.एससी. / एम.ए. (गणित / संख्याशास्त्र) या अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित / संख्याशास्त्र (एम.एससी. / एम.ए.) या विषयातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल.
- प्रत्येक विषयातील एम.एससी.च्या / एम.ए.च्या प्रत्येक वर्षासाठी शिष्यवृत्तीची रक्कम रू. १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) एवढी असेल. शिष्यवृत्तीधारकांना एम.एससी. / एम.ए. भाग १च्या परीक्षेत एकूण ६०% किंवा अधिक गुण मिळाले तरच ते एम.एससी. / एम.ए. भाग २च्या शिष्यवृत्तीस पात्र ठरतील.
- महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि महाराष्ट्रातील महाविद्यालय / विद्यापीठ किंवा अन्य अधिकृत (विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त) संस्थेमधे एम. एससी. / एम. ए. (गणित / संख्याशास्त्र)साठी प्रवेश घेतलेल्या (वंश, धर्म, जात व लिंग़भेद लक्षात न घेता) सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सदर योजना खुली आहे. ही शिष्यवृत्ती फक्त नियमित (रेग्युलर) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी एम.एससी. / एम.ए.च्या दोन्ही वर्षात प्रत्येकवर्षी एकूण ६० तास, मराठी विज्ञान परिषदेच्या ‘समाजासाठी विज्ञानप्रसार’ या कार्यात सहभागी होणे अपेक्षित आहे. हा सहभाग कार्यशाळा घेणे, व्याख्याने देणे, सामाजिक माध्यमातून विज्ञान प्रसार करणे, विज्ञान लेखन इत्यादींपैकी कोणत्याही प्रकारे करता येईल. शिष्यवृत्ती धारकाला आपल्या एम.एससी. / एम.ए. करीत असलेल्या संस्थेजवळील मराठी विज्ञान परिषद विभागाशी संपर्कात रहावे लागेल. ◆ पात्रता निकष:-
१) विद्यार्थ्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री) अथवा गणित / संख्याशास्त्र (ज्या विषयासाठी शिष्यवृत्ती अर्ज केला आहे) त्या विषयात १०वी, १२वी आणि बी.एससीच्या तृतीय वर्षात / बी.ए. अभ्यासक्रमाचा तृतीय वर्षात कमीत कमी ७०% गुण आवश्यक आहेत.
२) १०वीच्या परीक्षेत विद्यार्थाला एकूण कमीतकमी गुण ८०% आवश्यक आहेत.
३) १२वीच्या परीक्षेत विद्यार्थाला एकूण कमीतकमी गुण ७०% आवश्यक आहेत.
४) बी.एससी / बी.ए.च्या परीक्षेत विद्यार्थाला तिन्ही वर्षे मिळून, एकूण कमीत कमी गुण ६०% आवश्यक आहेत.
◆ अर्ज करण्याची पद्धत:-
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरून घेता येतील. विद्यार्थ्याने अर्जाची मुद्रित प्रत काढावी. पूर्ण भरलेला आणि सही केलेला अर्ज स्कॅन करून परिषदेच्या दिलेल्या ई-मेलवर पाठवावा किंवा परिषदेच्या पत्त्यावर पोस्टाने/कुरियरने पाठवावा. पूर्ण भरलेले आणि सही केलेले अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १५/०३/२०२१ असा आहे. या दिनांकानंतर आलेले आणि अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◆ संपर्क तपशील :
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.
फोन नंबर : ०२२-२४०५ ४७१४ / ०२२-२४०५ ७२६८
◆ इमेल: office@mavipamumbai.org / anagha.vidnyan@mavipamumbai.org