◆शिष्यवृत्तीबद्दल: –
एल अँड टी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एनआयटी , आयआयटी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये ME / MTech अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे. त्याचबरोबर या शिक्षणाचा संपूर्ण खर्च एल. अँड टी. या कंपनीतर्फे केला जाणार आहे. त्याचबरोबर कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एल अँड टी कंपनी मध्ये नोकरीची संधी सुद्धा मिळणार आहे. कोर्स चालू असताना विद्यार्थ्यांना भत्ता सुद्धा दिला जाणार आहे.
◆शिष्यवृत्ती: –
१) २४ महिन्यांच्या एमई / एमटेक कोर्ससाठी एल अँड टी कंपनीकडून ₹ १३,४००/ – भत्ता दिला जाईल.
२) विद्यार्थ्यांची सर्व महाविद्यालयीन फी व शिक्षण शुल्क एल अँड टी कंपनीतर्फे थेट संबंधित आयआयटी / एनआयटीला देण्यात येईल.
◆पात्रता निकष:-
बी.ई / बी.टेक ( सिव्हिल / इलेक्ट्रिकल) पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी बी. ई / बी.टेक अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमीस्टर पर्यंत किमान ७०% (१० पैकी ७ सीजीपीए ) गुण मिळवले आहेत असे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
◆महत्त्वाच्या तारखा: –
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 मार्च 2021
ऑनलाईन लेखी परीक्षा – एप्रिल २०२१ ते जून २०२१
मुलाखत – जून २०२१
अंतिम निकाल – जुलै २०२१
कोर्सची सुरुवात – ऑगस्ट२०२१
◆निवड प्रक्रिया:-
१) ऑनलाईन अर्ज
२) ऑनलाइन लेखी परीक्षा
३) वैयक्तिक मुलाखत
४)वैद्यकीय चाचणी.
◆ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: -.
https://eip.lntecc.com/hrmnet/HRMPages/CR/HrmCareersBIS.html
◆नोकरी: –
कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एल अँड टी कंपनीमध्ये नोकरी दिली जाईल.
◆संपर्क माहितीः-
वेबसाइट- www.Intece.com
पत्ता- लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, एल & टी हाऊस, एन. एम. मार्ग,
बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१,