एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशीप

SBI YOUTH FOR INDIA FELLOWSHIP

फेलोशीप बेनिफिट: –

  • वैयक्तिक खर्चाकरिता दर महिन्याला १५००० रुपये दिले जातील.
  • प्रोजेक्टच्या साहित्य खर्चा करिता दर महिन्याला १००० रुपये मिळतील त्याचबरोबर प्रवास खर्च करिता दर महिन्याला १०००रुपये दिले जातील.
  • फेलोशीप कालावधी दरम्यान विद्यार्थी ज्या क्षेत्रात काम करतील त्या क्षेत्रातील अनुभवी असणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर एसबीआय युथ फॉर इंडिया फाउंडेशन टीम मेंबर कडून सपोर्ट आणि गायडन्स मिळेल.
  • फेलोशिप करता ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी देखील काढली जाईल.
  • फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर 60000 रुपये दिले जातील.
    -विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून ते प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत पोहचण्याकरिताचे आणि परत घरी येण्याकरिताचे ३ टीअर AC ट्रेन तिकिटाचे किंमत तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी प्रवास करण्यासाठी झालेला खर्च दिला जाईल .
  • फेलोशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2023

फेलोशिप बद्दल :-
एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिप हा १३ महिण्यांकरिता दिली जाणारी फेलोशीप आहे. ज्यामध्ये दरवर्षी, निवडलेल्या शहरी तरुणांना संपूर्ण भारतातील ग्रामीण विकास प्रकल्पांवर काम करण्याची संधी दिली जाते.
ज्या उमेदवारांची फेलोशिप करता निवड होईल त्यांना आरोग्य, ग्रामीण राहणीमान, अन्नसुरक्षा, पर्यावरण संरक्षण, शिक्षण, पाणी, तंत्रज्ञान, स्त्री सक्षमीकरण, सोशल एंटरप्रेनरशिप, त्याचबरोबर ट्रॅडिशनल क्राफ्ट आणि पारंपारिक ऊर्जा अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे
पात्रता निकष:-
१) फेलोशिप करता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फेलोशीप सुरू होण्याच्या दिवशी वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, म्हणजे उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९२ पूर्वीचा नसावा आणि १ ऑक्टोबर २००२ नंतरचा नसावा.
२) फेलोशीप सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केली असावी. ०१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे, फक्त असेच विद्यार्थी या फिलोशीकरिता अर्ज करू शकतात.
३) फेलोशिपकरता अर्ज करणारे विद्यार्थी भारत, भूतान किंवा नेपाल या देशांचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आहेत ते सुद्धा या फिलोशीप करिता अर्ज करू शकतात.
ओसीआय (Overseas Citizen Of India ) उमेदवारांना सूचना :- सध्या आपल्याकडे ओसीआय कार्ड नसल्यास ओसीआय नोंदणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्या. ओ सी आय कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेस कमीतकमी १-३ महिने लागतात, त्यामुळे आपण आपला फेलोशीप अर्ज करण्यास सुरू करताच आपण ओसीआय कार्डकरिता अर्ज करा.

अर्ज करण्याची प्रक्रिया: –
एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशीपची अर्ज आणि निवड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे दोन टप्प्यांत विभागली आहे:
स्टेज -१ (ऑनलाइन अर्ज आणि ऑनलाइन ॲसेसमेंट)
स्टेज -२ ( वैयक्तिक मुलाखत )

फेलोशिप बद्दल अधिक प्रश्न असतील तर पुढील लिंक ला भेट द्या.:-
https://youthforindia.org/faq

ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://register.you4.in/?utm_source=website&utm_medium=cta&utm_campaign=organic&utm_term=fellowship-2023

संपर्क तपशील:-
वेबसाइट- https://youthforindia.org/
ईमेल- applications@youthforindia.org