राईट स्टुडिओ फेलोशिप

फेलोशिपची रक्कम :- १०,०००(दहा हजार) युरोज इतका निधी किमान दोन व्यक्तींमध्ये वाटून दिला जाईल.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २० मार्च २०२१

फेलोशिप विषयी माहिती :-
१) बर्लिन मधील राईट स्टुडिओ हे लोकांसाठी आणि संस्थांसाठी एक नवे क्रिएटिव्ह हब बनले आहे. जे त्यांचे लक्ष आर्ट्स आणि क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्सद्वारे (अभिव्यक्तिद्वारे) मानव अधिकार या लहान मुलं, युवक आणि पुढच्या पिढीवर परिणाम करणाऱ्या मुद्द्याकडे वळवते.

२) ज्यांना सामाजिक न्याय या विषयात आवड आहे त्यासोबतच ते आपल्या कलेमधून लहान मुलांचे हक्क व मानवी हक्क या विषयांवर भाष्य करू शकतील अशा युवा कलाकारांना सक्षम करण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते.

३) आम्ही तुम्हाला एका विशिष्ट रकमेबरोबरच तुम्ही काय करावे याचा निर्णय घ्यायला मदत करणारी एक नियमावली (फ्रेमवर्क) देऊ जी तुम्हाला पूर्णतः समर्थन (पाठिंबा देणारी) करणारी असेल. मात्र तुम्ही काय काम करणार आहात आणि ते कसं करणार आहात याच संपूर्ण कलात्मक कंट्रोल (नियंत्रण) तुमचं असेल. फक्त एक अट असेल की तुमच्या कलेतून सर्व ठिकाणी लहान मुले आणि युवकांवर परिणाम करणारे (मानव अधिकार) विषय हाताळले जावेत. आणि तुमची तयार केलेली कलाकृती ही सर्वांसाठी ओपन सोर्स फॉरमॅट मध्ये खुली करण्यात यावी ज्यायोगे ती आमच्या ग्लोबल माध्यमावर आम्ही शेयर करू शकू.

४) पहिली फेलोशिप चार तरुण महिला कलाकारांसह लंडनमध्ये चालविली गेली, आमची सलग्न संस्था, बाल हक्क आंतरराष्ट्रीय नेटवर्क, (CRIN) सीआरआयएन यांच्या मार्गदर्शनाखाली. या दुसर्‍या फेलोशिपसाठी आम्ही बर्लिनमधील तरुण लोक शोधत आहोत.

ही संस्था तुम्हाला काय ऑफर करत आहे?
१) निधी – यात १०,००० (दहा हजार) युरोज कमीतकमी दोन जणांमध्ये शेयर करण्यासाठी दिले जातील. यामध्ये तुम्ही या कामाला देत असलेल्या वेळेचे आणि वापरत असलेल्या सामानाचे पैसे दिले जातील.
२) आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे तुम्ही कामाचे प्लॅनिंग केल्यापासून ते प्रत्यक्ष सुरु करण्यापर्यंत आमचा पाठिंबा आणि मार्गदर्शन देऊ. तुम्हाला विविध व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल. आमच्या लंडन येथील सीआरआयएन (CRIN) संस्थेत कला आणि मानव अधिकार आणि कॅम्पेनिंग या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. येथील पहिले चार फेलोज सुद्धा सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतील. आम्ही प्रकल्पासाठी वित्त व्यवस्थापित (पैशांच व्यवस्थापन) करण्यासाठी काही मार्गदर्शन देखील देऊ शकतो.

पात्रता
१) वयवर्षे २१ पर्यंत कोणीही व्यक्ती या फेलोशिपसाठी अर्ज करू शकते.
२) आपण व्यक्ती म्हणून किंवा विद्यमान प्रकल्प, समुदाय गट, शाळा किंवा तत्सम माध्यमातून अर्ज करू शकता.
३) आपल्या वेळापत्रकानुसार हा प्रकल्प सहा ते बारा महिन्यांच्या दरम्यान चालू शकेल;
४) आमच्याशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला बेसिक इंग्रजी येण गरजेच आहे. तुमची कलाकृती ही इंग्रजीत असावी असे काही नसून ती तुमच्या भाषेतही देऊ शकता. तुम्ही त्याचे भाषांतरही देऊ शकता ते देताना ते योग्य अशा ऑर्डर ने देता येईल का ते एकदा तपासा जेणे करून आपल्या ग्लोबल प्रेक्षकांपर्यंत ते नीट पोहचवू शकू.

अर्ज करण्यापूर्वी “आमची प्रेरणा” आणि “सीआरआयएन कोड” वाचा जे आमची तत्त्वे ठरवते. हे आपण काय करतो, कसे आणि कोणाबरोबर भागीदार आहोत हे मार्गदर्शन करतात.

• आमची प्रेरणा :- https://rights-studio.org/our-inspiration/
• CRIN कोड:- https://home.crin.org/the-crin-code

अर्ज करण्याची प्रक्रिया
१) कृपया एकाच पानात उत्तर द्या.
खालील तीन प्रश्नांची उत्तरे द्या:
• तुम्ही कोण आहात?
• आपल्याला या प्रकल्पात स्वारस्य का आहे?
• असे कोणते विषय (समस्या) आहेत ज्यांसाठी आपण काम करत आहात किंवा काळजी घेत (करत) आहात?

२) आपल्याला या फेलोशिपचे अनुदान मिळाल्यास आपण त्याचे काय कराल हे जास्तीत जास्त १०० शब्दांत सांगा. यासाठी तुम्ही विविध मटेरियल किंवा लिंक जोडू शकता.

३) कृपया आपल्या मागील कार्याची दोन उदाहरणे पाठवा.

कोविडच्या च स्थितीमुळे सर्व संभाषण डिजिटल करण्यात आली आहेत.

• तुमचा ईमेल येथे पाठवा :- info@rights-studio.org

संपर्काचा तपशील :-
Email: info@rights-studio.org

वेबसाईट : https://rights-studio.org/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *