WE ज्ञान शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे :-
● B.Sc. / B.Tech./ B.Pharm अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मुलींसाठी – 3 महिन्यांसाठी 10,000 प्रति महिना शिष्यवृत्ती
● M.Sc / एम.टेक. / M.Pharm च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी. – 6 महिन्यांसाठी 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती
● सुरुवातीच्या टप्प्यातील मुली उद्योजकांसाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी B.Sc. / B.Tech. / B.Pharm किंवा M.Sc./ M.Tech. / M.Pharm यापैकी कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या आणि उद्योजकतेमध्ये करियर करणाऱ्या विद्यार्थीनींकरिता – प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसाठी 6.5 लाख आणि 6 महिन्यांसाठी 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती.

– या क्षेत्रातील अनुभवी महिलांसोबत संवादसत्रात सहभागी होण्याची संधी.

– रसायनशास्त्र क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्या महिलांकडुन मार्गदर्शन मिळवण्याची संधी.

– भारतातील विज्ञान आधारित स्टार्टअपना भेट देण्याची संधी

– सदर क्षेत्रातील उदयोग व संशोधन प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी

– रसायनशास्त्र विषयातील उदयोग , शैक्षणिक, नव- उदयोग क्षेत्रातील महिला तज्ञांकडून

त्यांच्या कामगिरीबदद्ल अनुभव ऐकण्याची संधी

-पुणे नॉलेज क्लस्टरच्या वूमन इन केमिस्ट्री & सस्टेनेबिलिटी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून रसायनशास्त्रातील नवीन संधींबद्दल माहिती मिळवण्याची संधी.

◆ शेवटची तारीख:– १५ जुलै २०२३

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
WEnyan शिष्यवृत्ती रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दिली जाणारी संशोधन शिष्यवृत्ती असुन या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन सुद्धा दिले जाते. शिष्यवृत्ती BASF केमिकल्स इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने हि शिष्यवृत्ती स्पॉन्सर केली असून पुणे नॉलेज क्लस्टरकडून प्रधान वैज्ञानिक सल्लागार (GoI) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे.
WEnyan शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कमी उत्पन्न गटातील पात्र महिला उमेदवारांना फंडिंग सपोर्ट, मार्गदर्शन आणि उद्योजक कौशल्य विकास अशा सुविधा पुणे नॉलेज क्लस्टरकडून उपलब्ध करून दिल्या जातात. ही शिष्यवृत्ती Applied Natural Sciences, Specialty Chemicals, Agro-Chemicals, New Materials, Sustainability यासारख्या संबंधित क्षेत्रातील मुलींना दिली जाते.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन
अभ्यासक्रमाचे नाव: B.Sc./ B.Tech./ B.Pharm./ M.Sc./ M.Tech./ M.Pharm

◆ पात्रता निकष:-
खालील पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी WEnyan शिष्यवृत्तीकरिता अर्जासाठी पात्र आहेत.
1) महाराष्ट्रातील उपेक्षित समाजातील / कमी उत्पन्न गटातील मुली.
2) सध्या B.Sc / बी.फार्म. / बी.टेक. / B.E. किंवा M.Sc. / एम.फार्म. / एम.टेक. / M.E या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनी.
3) बीएस्सी / बी.फार्म. / बी.टेक. / B.E. किंवा M.Sc. / एम.फार्म. / एम.टेक. / M.E यांसारखी कोणताही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि त्यांची बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर एक वर्षाच्या आत उद्योजकतेमध्ये करियर करू इच्छिनाऱ्या मुली.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) संशोधन प्रकल्प किंवा उद्योजकता प्रकल्प प्रस्ताव –
2) ईयत्ता 12वी ची मार्कशीट
3} मागील उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे मार्कशीट
4) उत्पन्न गट पुरावा (नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र)

◆ टीप- संशोधन प्रकल्प प्रस्ताव, उद्योजकता प्रकल्प प्रस्ताव, कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र टेम्पलेट खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
https://drive.google.com/drive/folders/1f3kCtNiIGUCeNefwQSZKrNf0N_yHnpze

◆ शिष्यवृत्ती माहितीपुस्तिका डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1YIMHAFYDg6Q1fZH6ik2v9jrG9xHNu6cY/view?usp=sharing

◆ WE ज्ञान शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.pkc.org.in/pkc-focus-area/capacity-building/stem-education/wenyan/

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSce0d-Iueyc4L1TW4F3D9OTTiaMB9OsY9uk8x8n0jktb582FA/viewform

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- पुणे नॉलेज क्लस्टर, तिसरा मजला, प्लेसमेंट सेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र 411007
ईमेल- wenyan@pkc.org.in, contact@pkc.org.in,
संपर्क व्यक्ती-
डॉ. शिल्पा जैन, कार्यक्रम व्यवस्थापक, ईमेल- shilpa.jain@pkc.org.in
डॉ. रितिका गांगुली, प्रकल्प व्यवस्थापक, ईमेल- ritika.ganguly@pkc.org.in
फोन: ७८२३८९२४७४