विद्याधन शिष्यवृत्ती- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी
● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- १५ ऑगस्ट २०२३
● शिष्यवृत्तीबद्दल :-
विद्याधन शिष्यवृत्ती हि सरोजिनी दामोदरन फाउंडेशनतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाते. ईयत्ता दहावी पूर्ण केलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. हि शिष्यवृत्ती ईयत्ता 11 वी & 12 वी साठी दिली जाईल, जर विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण चालू ठेवले आणि चांगली शैक्षणिक कामगिरी केली तर त्यांच्या आवडीचा कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी 10,000 ते 60,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. शिष्यवृत्तीसह विद्यार्थ्यांना सरोजिनी दामोदरन फाऊंडेशनकडून मार्गदर्शनही केले जाईल .
● शिष्यवृत्तीची रक्कम : – रु. १०,००० प्रति वर्ष
● या शिष्यवृत्तीकरिता कोण अर्ज करू शकतो? :-
1) ज्या विद्यार्थ्यांनी २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि १०वीच्या परीक्षेत ८५% किंवा ९ CGPA मिळवले ते विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2) ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
टीप :- जर विद्यार्थी अपंग असेल तर विद्यार्थ्याने 10वीच्या परीक्षेत किमान 75% गुण मिळवले पाहिजेत.
● निवड प्रक्रिया:-
१) ऑनलाईन अर्ज
2) ऑनलाइन चाचणी / मुलाखत
● महत्वाच्या तारखा:-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑगस्ट २०२३
स्क्रीनिंग चाचणीची तारीख – 9 सप्टेंबर 2023
मुलाखत/चाचण्यांची तारीख- 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2023
● आवश्यक कागदपत्रे:-
1) छायाचित्र
2) 10वी मार्कशीट
३) उत्पन्नाचा दाखला
● संपर्क तपशील:-
ईमेल – maharashtra.vidyadhan@sdfoundationindia.com
फोन- 9663517131
वेबसाइट:- https://www.vidyadhan.org
● शिष्यवृत्ती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल तपशील:-
https://www.vidyadhan.org/apply
● ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyadhan.org/register/student