विषयी माहिती:
TNAI (ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया) आणि SNAI (स्टुडंट नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया) या शिष्यवृत्त्या नर्सिंग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक मदत करण्यासाठी दिल्या जातात. या शिष्यवृत्त्या TNAI कडून भविष्यातील नर्सेसच्या शिक्षणाला आणि प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जातात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 मे 2025
फायदे:
नर्सिंग शिक्षणासाठी 24,000 रुपयांची आर्थिक मदत.
TNAI आणि SNAI कडून मान्यता.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना आधार.
पात्रता निकष :
TNAI शिष्यवृत्ती साठी:
TNAI चे आजीवन सदस्य असणे आवश्यक
GNM, P.B. B.Sc. (N) किंवा B.Sc. (N) अभ्यासक्रमात प्रवेश असणे आवश्यक
कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक आहे
SNAI शिष्यवृत्ती साठी:
सध्या नर्सिंगचा विद्यार्थी असणे आवश्यक
हायस्कूल (Higher Secondary) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
संस्थेच्या प्राचार्य आणि SNAI युनिट सल्लागाराकडून शिफारसपत्र आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे :
TNAI शिष्यवृत्ती साठी:
GNM / P.B. B.Sc. (N) / B.Sc. (N) ची गुणपत्रिका (स्कॅन केलेली).
नर्सेस आणि मिडवाइव्ह्स कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र.
सरकारी प्राधिकरणाकडून मिळालेला कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
TNAI आजीवन सदस्यत्व कार्ड (झेरॉक्स).
बँक पासबुकचे पहिले पान किंवा रद्द चेक.
आधार कार्डाची झेरॉक्स.
प्राचार्याचे शिफारसपत्र (संस्थेच्या लेटरहेडवर, स्कॅन केलेले)..
SNAI शिष्यवृत्ती साठी:
हायस्कूल किंवा समकक्ष गुणपत्रिका (स्कॅन केलेली).
कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र.
बँक पासबुकचे पहिले पान किंवा रद्द चेक.
आधार कार्डाची झेरॉक्स.
प्राचार्याचे शिफारसपत्र (संस्थेच्या लेटरहेडवर, स्कॅन केलेले).
SNAI युनिट सल्लागाराचे शिफारसपत्र (स्कॅन केलेले).
निवड प्रक्रिया :
सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज JPG किंवा PDF फॉरमॅटमध्ये सादर करा.
अर्जांचे परीक्षण शैक्षणिक कामगिरी, आर्थिक गरज आणि शिफारसी यांच्या आधारे केले जाईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना TNAI/SNAI कडून अधिकृत माहितीच्या माध्यमातून सूचित केले जाईल.
मुख्य वेबसाइट :
https://scholarship.tnaionline.org/TNAI/Index
अर्ज लिंक्स
TNAI शिष्यवृत्ती साठी:
https://scholarship.tnaionline.org/TNAI/Index
SNAI शिष्यवृत्ती साठी:
https://scholarship.tnaionline.org/SNAI/Index