◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ५०,०००
◆ शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
ही शिष्यवृत्ती टिमकन इंजिनीअरिंग अँड रिसर्च इंडिया प्रा. लि. तर्फे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओळखणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हे आहे.
◆ पात्रता निकष:-
1) आयटीआयच्या पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी इयत्ता १०वीमध्ये किमान ५०% गुण मिळवले आहेत.
2) ज्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे.
3) शिष्यवृत्तीचे प्राधान्य बंगलोर, चेन्नई, जमशेदपूर आणि भरुच येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाईल.
◆ कोण अर्ज करू शकतात:-
सरकार मान्यताप्राप्त संस्थांमधून आयटीआय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेले भारतीय विद्यार्थी.
◆ आवश्यक कागदपत्र:-
1) अर्जदाराचा फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा दाखला
5) विद्यार्थी बँक पासबुक
6) १०वी आणि १२वीचे मार्कशीट (१२वी नंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२वीचे मार्कशीट आवश्यक आहे)
7) चालू वर्षाच्या फी पावत्या
8) संस्थेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
9) मागील शैक्षणिक मार्कशीट
◆ अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/118/875_5.html
◆ संपर्क तपशील :-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४
फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- पियुष गंगवार