◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा गरजू विद्यार्थ्यांकरिता टाटा ट्रस्ट मार्फत हि शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीपासून ते पदवी पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीसाठी परीक्षेत मिळवलेल्या मार्कांची कोणतीही अट नाही. तसेच फक्त जे विद्यार्थी मागील इयत्तेत परीक्षा उत्तीर्ण आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात.
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
३१ जानेवारी २०२३.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
इयत्ता 8वी, 9वी, 10वी, ITI, 11वी, 12वी, कोणताही अंडर ग्रॅज्युएशन कोर्स, कोणताही मेडिकल स्ट्रीम कोर्स.
◆ पात्रता निकष :-
- मुंबई आणि मुंबई उपनगरीय भागातील महाविद्यालये किंवा शाळांमध्ये वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
- मागील इयत्तेत पास विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.( कमीत कमी गुणांची कोणतीही अट शिष्यवृत्ती करीत अर्ज करण्याकरिता नाही.)
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
◆ आवश्यक कागदपत्रे :-
- विद्यार्थी आणि कुटुंबाची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी सांगणारा अर्ज.
- शैक्षणिक वर्ष 2021 – 2022 मार्कशीट.
- शैक्षणिक वर्ष 2022-2023 फीच्या पावत्या.
- कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा – पालकांची लेटेस्ट सॅलरी स्लिप किंवा एम्प्लॉयर लेटर
◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
ऑनलाइन
तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज आणि वर नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती igpedu@tatatrusts.org या ईमेलवर पाठवा.
◆ टीप:-
- ही शिष्यवृत्ती फक्त मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे या परिसरात असणाऱ्या शाळा किंवा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे.
- अभियांत्रिकी शाखेत शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र नाहीत.
- एटीकेटी विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय किंवा शाळेची फी भरणे आवश्यक आहे कारण अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना महाविद्यालय किंवा शाळेची फी भरली असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवताना विद्यार्थ्यांनी कागदपत्रे आवश्यक विभागात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची एकच पीडीएफ पाठवावी.
◆ संपर्क तपशील:-
पत्ता-
बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001, भारत
फोन- 02266658282 / 0226665 8013
Emial:- talktous@tatatrusts.org
igpedu@tatatrusts.org
◆ अधिक माहितीसाठी भेट द्या:-
https://www.tatatrusts.org/our-work/individual-grants-programme/education-grants