शिष्यवृत्ती रक्कम: ₹50,000 (पन्नास हजार रुपये
अर्जाची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025
🔹 शिष्यवृत्तीबद्दल:
जे विद्यार्थी हुशार आहेत पण आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण थांबण्याचा धोका आहे, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करण्याचा स्वामी दयानंद फाउंडेशन चा उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती इंजीनियरिंग, वैद्यकीय (MBBS) आणि वास्तुशास्त्र (B.Arch) अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना दिली जाते.
या वर्षी BE/ B.Tech / MBBS / B.Arch मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती करिता अर्ज करता येईल.
🔹 शिष्यवृत्तीकरिता पात्र अभ्यासक्रम:
अभियांत्रिकी (BE / B.Tech)
वास्तुशास्त्र (B.Arch)
वैद्यकीय (MBBS)
🔹 पात्रता निकष:
1️⃣ वरती नमूद केलेल्या अभ्यासक्रमात फक्त पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी १२वीत किमान ८०% गुण मिळवले आहेत ते विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
2️⃣ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१२ लाखांपेक्षा कमी असावे.
3️⃣ विद्यार्थ्यांनी NEET / JEE परीक्षा १२वीच्या त्याच वर्षी उत्तीर्ण केलेली असावी. (गॅप वर्ष असलेले विद्यार्थी पात्र नाहीत.)
🔸 एकूण शिष्यवृत्तींपैकी ३०% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे.
🔸 शिष्यवृत्तीकरिता शासकीय शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य.
🔹 आवश्यक कागदपत्रे:
1️⃣ विद्यार्थ्याचा फोटो
2️⃣ कॉलेज ॲडमिशन लेटर किंवा कॉलेज आयडी कार्ड
3️⃣ 10वी आणि 12वी मार्कशीट / प्रमाणपत्र
4️⃣ JEE/NEET निकाल
5️⃣ कॉलेज फी पावत्या
6️⃣ कुटुंबाचे उत्पन्न पुरावा (Salary Slip/IT Return/Pension Copy)
7️⃣ वीज किंवा पाणी बिल
8️⃣ पालक शेतकरी असल्यास शेतीचे कागदपत्र
9️⃣ BPL कार्ड (लागू असल्यास)
🔟 व्यवसाय असल्यास दुकानाचे फोटो
🔹 अधिक माहितीसाठी लिंक:
https://www.swamidayanand.org/scholarship-india
🔹 ऑनलाइन अर्जासाठी लिंक:
https://www.swamidayanand.org/indiascholarship2025-26
🔹 संपर्क तपशील:
Swami Dayanand Education Foundation
A-74, ग्राउंड फ्लोअर, सेक्टर-2, नोएडा – 201301, उत्तर प्रदेश (भारत)
Email: scholarships@swamidayanand.org
Tel: +91-120-4146823
WhatsApp: 8448770654

