सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्ती
(आयटीआय अभ्यासक्रमांसाठी)

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
कोणत्याही आयटीआय अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सीताराम जिंदाल फाउंडेशनतर्फे सीताराम जिंदाल फाऊंडेशन शिष्यवृत्ती दिली जाते. संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२

शिष्यवृत्तीची रक्कम:-
कोणत्याही शासकीय आयटीआय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
कोणत्याही खाजगी आयटीआय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा ७०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत असल्यास अधिकचे दरमहा १२०० रु मिळतील.

पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: कोणताही आयटीआय अभ्यासक्रम
पात्र ITI अभ्यासक्रम लिस्ट डाउनलोड करण्यासाठी (खालील लिंकवर क्लिक करा)
https://drive.google.com/file/d/1k-bAveZSVd8L6mLVqYVD4RCnW46G_xwn/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्तीसाठी आवश्यक गुण :- कमीतकमी ४५% मुलांकरिता आणि ३५% मुलींकरिता

◆ पात्रता निकष:-
1 कोणत्याही ITI अभ्यासक्रमात शिकणारे आणि गेल्या शैक्षणिक वर्षात किमान ४५% (मुलांसाठी), ३५% (मुलींसाठी) गुण मिळवलेले विद्यार्थी सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) ITI अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा :-
i) पालक नोकरी करत असल्यास – पालकांचे उत्पन्न प्रति वर्षी चार लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, सॅलरी स्लिप उत्पन्नाचा पुरावा म्हणून सबमिट करावी लागेल.
ii) जर पालक नोकरी करत नसतील तर अशा विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकरणांद्वारे (तहसीलदार, महसूल अधिकारी, बीडीओ, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत अध्यक्ष.) जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून सबमिट करावे लागेल.

टीप:
१) विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाच्या कालावधीत एकदाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा.
२) उत्पन्नाचे प्रमाणपत्र हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत जारी केले असल्यास, विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांनी स्वाक्षरीद्वारे प्रमाणित केलेल्या इंग्रजी किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या उत्पनाच्या प्रमाणपत्राची प्रत अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे.
३) सीताराम जिंदाल फाउंडेशन शिष्यवृत्ती सर्व शासकीय आणि खाजगी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

अर्ज करण्याची प्रक्रिया:-
१) खालील लिंकवर उपलब्ध अर्ज डाउनलोड करा
https://drive.google.com/file/d/1APmANG7OODbQxmhoWAA7WfSQ53Wb1x_-/view?usp=drivesdk
२) डाउनलोड केलेला अर्ज पूर्णपणे भरा
3) खालील पत्त्यावर कागदपत्रांसह पूर्णपणे भरलेला अर्ज पाठवा:
The Trustee, Sitaram Jindal Foundation,
Jindal Nagar, Tumkur Road, Bengaluru 560073

आवश्यक कागदपत्र:-
1) मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कलिस्ट
2) 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ( BOARD CERTIFICATE ) (त्यात जन्मतारीख नसल्यास, जन्मतारखेचा कोणताही अन्य पुरावा)
3) उत्पन्न प्रमाणपत्राची प्रत
4) Annexure -VIII नुसार वार्षिक शुल्काबाबतचे प्रमाणपत्र..
5) शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी, सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
6) पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (विद्यार्थी अनाथ असल्यास)
7) विधवा आणि माजी सैनिकांसाठी: i) PPO ii) माजी सैनिक विधवा आय-कार्ड iii) नातेसंबंध अवलंबित्व प्रमाणपत्र.
8) जर विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत असतील तर हॉस्टेल वॉर्डनचे Annexure -IV नुसार प्रमाणपत्र
जर विद्यार्थी खाजगी ठिकाणी राहत असेल तर किंवा खाजगी निवासस्थानाच्या मालकाकडून Annexure -IX नुसार प्रमाणपत्र

● टीप:-
1) फाऊंडेशनच्या वेबसाइटवरून मोफत डाऊनलोड करता येणारे अर्जच स्वीकारले जातील.
२) स्वतंत्रपणे मुद्रित केलेले अर्ज (प्रिटिंग प्रेसमध्ये) स्वीकारले जाणार नाहीत.
3) अनाथ विद्यार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
4) शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा अपंग विद्यार्थ्यांसाठी, गुणांची पात्रता टक्केवारी मागील उत्तीर्ण झालेल्या परीक्षेतील उत्तीर्ण गुण असेल.

शिष्यवृत्ती अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक:-
https://drive.google.com/file/d/1APmANG7OODbQxmhoWAA7WfSQ53Wb1x_-/view?usp=drivesdk

शिष्यवृत्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंक:-
https://www.sitaramjindalfoundation.org/scholarships-for-students-in-bangalore.php