श्री संप्रदा सिंघ शिष्यवृत्ती पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹७०,०००/-

◆ अंतिम तारीख:- १२/१०/२०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
श्री संप्रदा सिंग शिष्यवृत्ती कार्यक्रम हा अलकेम फाउंडेशनचा एक उपक्रम आहे. याद्वारे कोविडमुळे असुरक्षित झालेल्या आणि आर्थिक मदत दृष्टीने सक्षम नसणाऱ्या मुलांना मदत केली जाणार आहे. श्री संप्रदा सिंग शिष्यवृत्ती कार्यक्रम अशा विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्यातील शिक्षण कोणत्याही अडचणीशिवाय चालू राहण्यासाठी मदत करते. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.

◆ पात्रता निकष:-
1) जे विद्यार्थी पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेत आहेत, दहावी, बारावी, किंवा डिप्लोमा त्याच बरोबर ज्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ३५% गुण प्राप्त केले आहेत असे विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹८,००,०००च्या खाली आहे असेच विद्यार्थी पात्र असतील.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: कोणताही पदवी अभ्यासक्रम

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) अर्जदारचा फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) पालक मृत्यूचा दाखला
5) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
6) १०वी आणि १२वी गुणपत्रिका
7) चालू वर्षाची फी पावती
8) प्रवेश पत्र / बोनफाईड सर्टिफिकेट
9) मागील वर्षाची गुणपत्रिका (अपवाद: पहिल्या वर्षाचे विद्यार्थी)
10) डोमासाईल सर्टिफिकेट

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/218/412_4.html

◆ संपर्क तपशील:-
1)-पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
2) दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
3) ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

4 thoughts on “श्री संप्रदा सिंघ शिष्यवृत्ती पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी”

  1. Harsha Tryambakrao Shrawane

    पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही स्कॉलरशिप आहे का ?

    1. नाही. फक्त पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती आहे.

Comments are closed.