एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशीप

◆ फेलोशीप बेनिफिट: –
१५,००० +( १००० प्रवास खर्च ) प्रती महिना
ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी देखील काढली जाईल.

◆ पात्रता निकष:-
१) फेलोशीप कार्यक्रम सुरू होण्याच्या दिवशी वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, म्हणजे उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९८९ पूर्वीचा नसावा आणि १ ऑक्टोबर २०२० नंतरचा नसावा.
२) फेलोशीप कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केली असावी.
२) ओसीआय (Overseas Citizen Of India ) उमेदवारांना सूचनाः सध्या आपल्याकडे ओसीआय कार्ड नसल्यास ओसीआय नोंदणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्या. प्रक्रियेस कमीतकमी १-३ महिने लागतात, त्यामुळे आपण आपला फेलोशीप अर्ज सुरू करताच आपण ओसीआय कार्डकरिता अर्ज करा.

अर्ज करण्याची प्रक्रिया: –
एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशीपची अर्ज आणि निवड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
स्टेज -१ (प्राथमिक अर्ज)
https://youthforindia.org/home/web_contact या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करणे.
स्टेज -२ (ऑनलाईन मूल्यांकन)
स्टेज -३ (व्यक्तिमत्व मूल्यांकन आणि मुलाखत.)
स्टेज २ मध्ये सिलेक्ट केलेल्या उमेदवारांचे काही विशिष्ट पैलू समजून घेण्यासाठी, त्यांना व्यक्तिमत्व मूल्यांकन चाचणी देणे आवश्यक आहे. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना निवड मंडळाशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले जाईल. फेलोशीप प्रोग्रामला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी समविचारी तरुण, एसबीआय यूथ फॉर इंडिया टीम, आणि एसबीआय यूथ फॉर इंडिया माजी विद्यार्थी यांच्याशी जवळून संवाद साधण्यासाठी मुलाखत देखील घेतली जाईल.

संपर्काची माहिती:-
ईमेल- contactus@youthforindia.org

अधिक माहितीसाठी: https://sbiyouthforindia.freshdesk.com/support/solitions/articles/44001917806- what-is-the-last-date-for-submitting-the-application-for- या वेबसाईट वर भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: –
https://youthforindia.org/home

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *