संभवम फ्री ऑनलाइन आयएएस कोचिंग शिष्यवृत्ती
(सोनू सूद फाउंडेशनद्वारे)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २५ सप्टेंबर २०२२

◆संभवम मोफत ऑनलाइन IAS कोचिंग प्रोग्राम बद्दल:-
सोनू सुद चॅरिटी फाउंडेशनने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) च्या सहकार्याने सुरू केलेला संभावम हा एक विनामूल्य ऑनलाइन IAS कोचिंग प्रोग्राम आहे. सोनू सूद फाउंडेशनकडून नागरी सेवांच्या IAS परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम सुरु केला गेला आहे.
संभवम कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सेवा कोचिंग संस्थांमध्ये मोफत ऑनलाइन IAS कोचिंग मिळनार आहे.

◆संभवम आयएएस कोचिंग शिष्यवृत्तीचे फायदे:-
1) पात्र विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लासेस.
2) तज्ञ शिक्षक,UPSC कडून निवडलेल्या उमेदवारांकडून तसेच ज्या विद्यार्थ्यांनी UPSC मुलाखत दिली आहे अशा उमेदवारांकडून मेंटॉरशिप सपोर्ट.
3) तज्ञ शिक्षक आणि प्रशिक्षकांद्वारे व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष गट सत्रे.

◆ संभवम शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://soodcharityfoundation.org/donations/sambhavam-2022-23-free-online-ias-coaching/

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfi6HbvmE1tfE_dr0dHha76GQM7s01j_-y9YaHoA0zYokXOdA/viewform

◆संभवम मोफत ऑनलाइन IAS कोचिंग शिष्यवृत्तीच्या नियम व अटी
१) पात्रता निवडण्यासाठी ऑनलाइन चाचणी घेतली जाईल.
2) सुद चॅरिटी फाउंडेशन आणि डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) उमेदवारांना त्यांच्या निवड प्रक्रियेनुसार शॉर्टलिस्ट करतील.
3) निवडलेल्या उमेदवारांना सुद चॅरिटी फाउंडेशन आणि डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA)द्वारे विचारल्यास सर्व अनिवार्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
4) नॉन-रिफंडेबल नोंदणी शुल्क रु.५०/- नोंदणी आणि निवड प्रक्रियेसाठी डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) फाउंडेशनकडून शुल्क आकारले जाते.
5) आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि वंचित, परंतु पात्र उमेदवारांना संभवम मोफत ऑनलाइन IAS कोचिंग शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाईल.

◆ संपर्क तपशील:-
ईमेल- supportus@soodcharityfoundation.org
diya,ias@soodcharityfoundation.org
वेबसाइट – https://soodcharityfoundation.org