सक्षम शिष्यवृत्ती (डिप्लोमा कोर्सेससाठी)

◆ सक्षम शिष्यवृत्ती बद्दल:-
सक्षम शिष्यवृत्ती ही अरविंद फॅशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. कोणत्याही डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:– ₹२०,०००

◆ शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२

◆ पात्रता निकष:-
१) कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारे आणि १०वी, १२वीच्या परीक्षेत किमान ७०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
२) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ पात्र अभ्यासक्रम:– कोणताही डिप्लोमा अभ्यासक्रम.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) ओळखीचा पुरावा
2) संस्थेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा दाखला
5) विद्यार्थी बँक पासबुक
6) १०वी, १२वी परीक्षेची मार्कशीट
7) चालू वर्षाच्या फीच्या पावत्या

◆ अधिक माहितीसाठी:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/239/859_3.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ टीप:-
सक्षम शिष्यवृत्तीसाठी कर्नाटक राज्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- पियुष गंगवार