एल अँड टी बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रास / आयआयटी दिल्ली / एनआयटीके सुरथकल / एनआयटी त्रिची येथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमधील एम.टेकचा अभ्यास करण्यासाठी दिली जाते.

◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-
1) 24 महिन्यांच्या एमइ-एमटेक कोर्ससाठी विद्यार्थ्यांना 13,400/- रुपये प्रति महिना स्टायपेंड दिले जाईल. सर्व कॉलेज फी आणि ट्यूशन फी थेट संबंधित आयआयटी /एनआयटीला एल अँड टी द्वारे दिली जाईल.
2) विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रास / आयआयटी दिल्ली / एनआयटीके सुरथकल / एनआयटी त्रिची येथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट कोर्समध्ये 02 वर्षे पूर्णवेळ एम.टेकचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.
3) सर्व कोर्स फी पूर्णपणे एल अँड टी द्वारे दिली जाईल.
4) शिष्यवृत्ती कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना एल अँड टीप्रकल्प साइट्सवर काम करण्याची संधी मिळेल.
5) शिष्यवृत्ती कालावधीमध्ये बिल्ड इंडिया स्कॉलरशिपच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे मार्गदर्शन केले जाईल.
6) एमइ-एमटेक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून दिली जाईल .

◆ पात्रता निकष:-
१) सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील बीई/बीटेक पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) 2022 मध्ये किंवा त्यापूर्वी बीई/बीटेकपदवीधर झालेले विद्यार्थी बिल्ड इंडिया शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

◆ अर्ज करण्याची पद्धत:- फक्त ऑनलाइन

◆ महत्वाच्या तारखा:-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
लेखी परीक्षा — १९ मार्च २०२३
मुलाखतीची प्रक्रिया– एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान
अंतिम निकाल — मे २०२३ – जून २०२३

◆निवड प्रक्रिया:-
1) ऑनलाइन अर्ज
२) लेखी परीक्षा
3) वैयक्तिक मुलाखत

◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1133/81490/login.html

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.lntecc.com/build-india-scholarship/

◆ टीप:-
शिष्यवृत्ती अर्जात गुण लिहताना CGPA लिहू नका. त्याऐवजी, CGPA ला एकूण पर्सेंटेजमध्ये कॉन्व्हर्ट करून लिहा.

◆ संपर्क माहिती:-
पत्ता- लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, माउंट पूनमल्ली रोड, मानापक्कम,
चेन्नई – 600 089.
ईमेल- bis@lntecc.com
वेबसाइट- https://www.lntecc.com/build-india-scholarship/