केबल स्टार शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
आरआर केबल कंपनीने इलेक्ट्रिशियनच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 10वीची परीक्षा पूर्ण केलेल्या आणि सध्या 11वीत शिकत असलेल्या इलेक्ट्रिशियनची मुलेच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. यावर्षी एकूण 1000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रमाचे नाव: इयत्ता 11वी

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- रु 10,000/-
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- Not Declared

◆ पात्रता निकष:-
1) ज्या इलेक्ट्रिशननी आर आर केबल कंपनीच्या आर आर कनेक्ट या एप्लिकेशन वर नोंदणी केली आहे, फक्त अशा इलेक्ट्रिशनचा मुलगा किंवा मुलगी शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) अर्जदाराने पहिल्याच प्रयत्नात राज्य किंवा केंद्रीय बोर्ड 10वी इयत्तेत 45% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजेत.
3) ATKT विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
4) 2022-2023 या शैक्षणिक वर्षात 10वी इयत्तेची परीक्षा पूर्ण केलेले आणि सध्या 11वीत शिकणारे विद्यार्थीच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
२) दहावीची मार्कशीट
3) वडीलांचे आधार कार्ड
4) बँक खाते तपशील – पत्ता, खाते क्रमांक आणि IFSC कोड तपशीलांसाठी पासबुक प्रत

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://kabelstar.com/about/

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://kabelstar.com/application-form/

◆ संपर्क तपशील:-
फोन – 1800 1036 633
वेबसाइट – https://kabelstar.com/about/
पत्ता – राम रत्न हाऊस, युटोपिया सिटी, पी.बी. मार्ग, वरळी, मुंबई – ४०० ०१३, महाराष्ट्र.
ईमेल- contactus@kabelstar.com