◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹५०,०००/-
◆ अंतिम तारीख:- १७/०९/२०२१
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
जेएसडब्लू उम्मीद शिष्यवृत्ती उपक्रम हा जेएसडब्लू फाउंडेशन तर्फे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना कोविड-१९च्या संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण घेता येणार नाही. या महासाथीच्या गर्तेत जवळपास १.५ दशलक्ष शाळा बंद राहिल्या यामुळे २४७ दशलक्ष प्राथमिक तसेच माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. या विद्यार्थ्यांचा प्रवास दुर्दैवाने बालमजुरी आणि असुरक्षित स्थलांतरात होऊ शकतो. अशाच विद्यार्थ्यांना जेएसडब्लू उम्मीद शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण विनाअडथळा घेण्यास मदत होईल.
◆ पात्रता निकष:-
1) जे विद्यार्थी पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेत आहेत, दहावी, बारावी, किंवा डिप्लोमा त्याच बरोबर ज्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ३५% गुण प्राप्त केले आहेत असे विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
2) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, सालेम, कलमेश्वर, वासिंद, मुंबई, बारमेर, पालघर, ओडिशा भागातील जेएसडब्लूच्या प्लांट शेजारी राहतात असे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
3) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹८,००,०००च्या खाली आहे असेच विद्यार्थी पात्र असतील.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: कोणताही पदवी अभ्यासक्रम
◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) अर्जदारचा फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) पालक मृत्यूचा दाखला
5) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
6) १०वी आणि १२वी गुणपत्रिका
7) चालू वर्षाची फी पावती
8) प्रवेश पत्र / बोनफाईड सर्टिफिकेट
9) मागील वर्षाची गुणपत्रिका (अपवाद: पहिल्या वर्षाचे विद्यार्थी)
10) डोमासाईल सर्टिफिकेट
◆ अर्जसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/68/406_9.html
◆ संपर्क तपशील:-
1)-पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
2) दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
3) ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index